Full Width(True/False)

नेहा पेंडसे म्हणतेय, 'गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा'

मुंबई: महाराष्‍ट्र हे भारतातील भौगोलिकदृष्‍ट्या वैविध्‍यपूर्ण राज्‍य आहे आणि हीच विविधता येथील लोक व संपन्‍न संस्‍कृतीमधून दिसून येते. या महान भूमीची शोभा वाढवलेल्या संत व तत्त्वज्ञानींनी राज्‍याच्‍या ऐतिहासिक वारसामध्‍ये भर केली आहे. दरवर्षी १ मे रोजी महाराष्‍ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस मराठी भाषिक प्रांताने निर्माण केलेल्या स्‍वतंत्र राज्‍याचे प्रतीक आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये जन्‍म व मोठे झालेले एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकार व या अत्‍यंत महत्त्वाच्‍या दिनी राज्‍याप्रती त्‍यांचा आदर व निष्‍ठा व्‍यक्‍त करत आहेत. मालिका 'भाबीजी घर पर है'मधील नेहा पेंडसे म्हणाली, 'मला महाराष्‍ट्रीयन असण्‍याचा आणि या भूमीमध्‍ये जन्‍म घेतल्‍याचा अभिमान वाटतो. या भूमीमध्‍ये भारताची असंख्‍य संपादने व संपन्‍न इतिहास सामावलेला आहे. राज्‍याचा संपन्‍न सांस्‍कृतिक वारसा आहे आणि राज्‍याचा हा वारसा अनेक किल्‍ले, राजवाडे, गुहा, देवस्‍थान व वस्तुसंग्रहालय यांमधून दिसून येतो.' नेहा पुढे म्हणाली, 'राज्‍याचे लोकसंगीत, पारंपारिक नृत्‍ये व स्‍वादिष्‍ट पाककला देखील सर्वोत्तम आहेत. मी प्रसिद्ध किल्‍ले व वस्‍तुसंग्रहालयांना भेट देते तेव्‍हा त्‍यामागील ऐतिहासिक महत्त्व जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न करते. प्रत्‍येकवेळी नवीन गोष्‍टी समजल्‍यानंतर माझे मन अभिमानाने भरून जाते. मी आजच्‍या तरूणांना ते राहत असलेल्‍या राज्‍याबाबत व सखोल संस्‍कृतीबाबत अधिक जाणून घेण्‍याचे आवाहन करते. तुम्‍हा सर्वांना महाराष्‍ट्र दिनाच्‍या आनंदमय शुभेच्‍छा!' 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'मधील जगन्‍नाथ निवंगुणे ऊर्फ रामजी सकपाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्‍हणाले,'महाराष्‍ट्रीयन संस्‍कृती संपूर्ण भारतभरात वैविध्‍यपूर्ण व सर्वोत्तम आहे. मला महाराष्‍ट्रीयन असल्याचा अभिमान वाटतो. माझ्याकडून सर्वांना महाराष्‍ट्र दिनाच्‍या आनंदमय शुभेच्‍छा! बालपणापासून मी स्‍थानिकांना म्‍युझिकल रॅलीज, रस्‍त्‍यावरील 'लेझीम' व 'ढोल पथक' कार्यक्रमांमध्‍ये सहभाग घेताना पाहत आलो आहे आणि ते दृश्‍य अत्‍यंत विहंगमय असायचे. यंदा, सद्यस्थिती पाहता मी सर्वांना घरामध्‍येच सुरक्षितपणे कुटुंबासोबत हा दिवस साजरा करण्‍याची विनंती करतो. महाराष्‍ट्राने अनेक समस्‍यांचा सामना केला आहे आणि नेहमीच प्रबळपणे त्‍यावर विजय मिळवला आहे, हे विसरून चालणार नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3u96kIh