Full Width(True/False)

देशसेवेला प्राधान्य देत बिक्रमजीत कंवरपाल आधी झाले आर्मी ऑफिसर

मुंबई : ख्यातनाम अभिनेता यांचे करोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी बिक्रमजीत यांना करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचारही सुरू होते. परंतु करोनाविरुद्धची त्यांची लढाई अयशस्वी ठरली आणि शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खरे तर बिक्रमजीत अतिशय फिट होते. बिक्रमजीत यांचा जन्म २९ ऑगस्ट १९६८ मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये झाला होता. बिक्रमजीत यांचे वडील द्वरकानाथ कंवरपाल हे भारतीय सैन्यमध्ये अधिकारी होते. त्यांना १९६३ मध्ये कीर्तीचक्रने सन्मानित करण्यात आले होते. १९८६ मध्ये बिक्रमजीत कंवरपाल यांनी द लॉरेंस स्कूल, सनावर येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि १९८९ मध्ये आपल्या वडिलांप्रमाणे सैन्यात दाखल झाले. त्यांना सुमारे १३ वर्षे देशाची सेवा केली. खरे तर लहान असल्यापासूनच बिक्रमजीत यांना अभिनेता व्हायचे होते. परंतु आधी देशसेवेला त्यांनी प्राधान्य दिले. बिक्रमजीत यांनी २००३ मध्ये सिनेमासृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यांनंतर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केले. बिक्रमजीत यांनी आतापर्यंत ४१ सिनेमांमध्ये काम केले. त्याशिवाय दीया और बाती, हम यें चाहतें,दिल ही तो है आणि २४ या टिव्ही मालिकांमध्ये काम केले होते. बिक्रमजीत यांच्या निधनाबद्दल सिनेमासृष्टीतील अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. निर्माता मुकेश छाबरा यांनीही बिक्रमजीत यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनीही ट्वीट करून बिक्रमजीत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांनी लिहिले आहे की, ' आज सकाळी अभिनेता मेजर बिक्रमजीत यांचे करोनामुळे निधन झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झाले. ते सेवानिवृत्त सेना अधिकारी होते. त्यांनी सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्येही अभिनय केला होता. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांना झालेल्या दुःखामध्ये मी सहभागी आहे.' बिक्रमजीत यांच्या निधनाबद्दल मनोज बाजपेयी, श्रिया पिळगांवकर, रोहित रॉय, नील नितीन मुकेश यांच्यासह अनेक कलाकारांनी ट्विट करत बिक्रमजीत यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मनोज बाजपेयी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे, 'अरे देवा! ही खूपच दुःखद बातमी आहे. आम्ही एकमेकांना १४ वर्षे ओळखत होतो. १९७१ या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी आमची ओळख झाली. ही बातमी खूपच अस्वस्थ करणारी आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nBlYtw