मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी सिनेमात काम करत नसली तरी तिची लोकप्रियता कोणत्याही कलाकारापेक्षा कमी नाही. श्वेताचे वडिलांसोबत खूप चांगले बाँडिंग आहे. या दोघांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. जसे वडिलांसोबत श्वेताचे छान बाँडिंग आहे तसेच ते वहिनी ऐश्वर्या राय-बच्चन सोबतही आहे. परंतु ऐश्वर्याची एक गोष्ट श्वेताला अजिबात आवडत नाही. ऐश्वर्याच्या या न आवडणाऱ्या गोष्टीचा खुलासा श्वेताने एका मुलाखतीमध्ये केला आहे. तिने या मुलाखतीमध्ये आपल्या आयुष्यातील काही गोष्टींबद्दल सांगितले. जेव्हा श्वेताला ऐश्वर्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये एक प्रश्न असा होता की ऐश्वर्याबद्दल तुला काय आवडेत आणि तिची कोणती सवय तुला अजिबात आवडत नाही. त्यावर श्वेता नंदाने लगेचच उत्तर दिले. तिने सांगितले, 'ऐश्वर्या एक चांगली आणि स्ट्रॉग आई आहे. तिची ही गोष्ट मला खूप आवडते.' श्वेताने पुढे असेही सांगितले की, 'जेव्हा मी ऐश्वर्याला फोन अथवा मेसेज करते तेव्हा ती त्याचे लगेचच उत्तर देत नाही. ही ऐश्वर्याची गोष्ट मला अजिबात आवडत नाही.' आई-वडील दोघेही अभिनयाच्या क्षेत्रात असूनही श्वेताला कधीही अभिनय करण्याची इच्छा झाली नाही. याबाबत तिला विचारले असते तिने सांगितले,' मला कॅमेऱ्याची भिती वाटते आणि त्याचबरोबर गर्दीमध्ये जाण्याची मला भीती वाटते. त्याचसोबत माझ्यात अभिनेत्री होण्याचे गुण आहेत असं मला अजिबात वाटलं नाही. माझा चेहराही तसा नाही. त्यामुळे मी जिथे आहे आणि जी आहे त्यात आनंदी आहे.' दरम्यान श्वेताचे १९९७ मध्ये निखील नंदा यांच्याशी लग्न झाले. निखील आणि श्वेताला नव्यानवेली नंदा आणि अगस्त्य नंदा ही दोन मुले आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vygPFn