Full Width(True/False)

इंटरनेट एक्स्प्लोरर बंद होणार, याजागी 'हे' नवीन नवे ब्राउजर येणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली ‘’ने आपले लोकप्रिय वेब ब्राउजर ‘’ (आयई) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेब ब्राउजरने गेले २५ वर्षांहून अधिक काळ ग्राहकांची सेवा केली आहे. ‘इंटरनेट एक्स्प्लोरर’ बंद करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ‘मायक्रोसॉफ्ट’ने गेल्या काही वर्षांपासून यूझरना ‘एज’ हे नवे ब्राउजर सादर केले होते. वाचाः पुढील वर्षी १५ जूनला ‘इंटरनेट एक्स्प्लोरर’ कायमस्वरूपी निवृत्त होणार असल्याचेही ‘मायक्रोसॉफ्ट’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘इंटरनेट एक्स्प्लोरर’चा वापर खूपच कमी झाला होता. त्यामुळे ते यूझरच्या विस्मरणातच गेले होते. सध्या वापरात असणाऱ्या अन्य अत्याधुनिक ब्राउजरच्या तुलनेत ‘इंटरनेट एक्स्प्लोरर’ खूपच मागास होते. ‘मायक्रोसॉफ्ट एज’चे प्रोग्रॅम मॅनेजर सीन लिंडर्से यांनी ‘इंटरनेट एक्स्प्लोरर’ कायमस्वरूपी बंद करीत असल्याची घोषणा केली. या वेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘विंडोज १०’वर ‘इंटरनेट एक्स्प्लोरर’च्या ऐवजी यूझरना ‘मायक्रोसॉफ्ट एज’चा वापर करता येणार आहे. लवकरच ‘इंटरनेट एक्स्प्लोरर ११’ डेस्कटॉप अॅप बंद होणार असून, १५ जून २०२२ पासून ते ‘विंडोज १०’च्या सपोर्टमधून बाहेर पडेल, असेही लिंडर्से यांनी नमूद केले. वाचाः ‘मायक्रोसॉफ्ट’ने दिलेल्या माहितीनुसार ‘विंडोज १०’च्या ‘लाँग टर्म सर्व्हिसिंग चॅनल’मध्ये पुढील वर्षीपर्यंत ‘इंटरनेट एक्स्प्लोरर’चा समावेश राहणार आहे. त्यानंतर त्याचा वापर यूझरना करता येणार नाही. दरम्यान, आगामी काळात ‘विंडोज’ व्हर्शनसह ‘इंटरनेट एक्स्प्लोरर’चा अंतर्भाव असणार नसल्याचेही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले. ‘मायक्रोसॉफ्ट एज’ घेणार जागा ‘इंटरनेट एक्स्प्लोरर’ पुढील वर्षीपर्यंत कार्यान्वित राहणार असून, त्यानंतर त्याची जागा ‘मायक्रोसॉफ्ट एज’ घेणार आहे. ही प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी काही महिन्यांपूर्वी कंपनीने ‘मायक्रोसॉफ्ट एज’साठी ‘आयई’ मोडची निर्मिती केली होती. या मोडच्या माध्यमातून जुना ब्राउजर हटवून नव्या ब्राउजरचा वापर करता येणार आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’ने दिलेल्या माहितीनुसार २०२९पर्यंत ‘एज’ हा ब्राउजर ‘आयई’ मोडमध्ये कार्यरत राहणार आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hYgUPp