म. टा. प्रतिनिधी, पुणे तडीपार गुंडांवर नजर ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या ‘एक्स्ट्रा’ (ट्रॅकिंग ऑफ एक्सटर्निज) अॅपवरून १४२ तडीपार गुंडांवर नजर ठेवली जात आहे; परंतु या अॅपवरून आतापर्यंत फक्त एकाच तडीपाराला अटक करण्यात यश आले आहे. त्यामुळे अॅपवरून तडीपारांवर नीट नजर ठेवली जात नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाचाः शहराचा वाढत्या विस्तारामुळे तडीपार केलेल्या गुंडांवर वैयक्तिक लक्ष ठेवणे पोलिसांना अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक वेळा तडीपार गुंड पुन्हा शहरात येऊन गुन्हे करीत असल्याचे दिसून आले होते. २०२०मध्ये तडीपार गुंडांनी शहरात येऊन सुमारे १०२ गुन्हे केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तडीपार गुंडांवर लक्ष ठेवण्यासाठी अॅप सुरू करण्यात आले होते. यात लोकेशन, सेल्फी फोटोनुसार आरोपीवर लक्ष ठेवले जाते. आरोपी शहरात आल्यास तत्काळ त्याची माहिती पोलिसांना मिळण्याची सोय करण्यात आली आहे. वाचाः पुणे पोलिसांनी गेल्या वर्षी सप्टेंबरपासून ते १५ मे २०२१पर्यंत साधारण १४२ आरोपींना तडीपार केल्यानंतर त्यांच्यावर ‘एक्स्ट्रा अॅप’च्या मदतीने नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत फक्त हडपसर परिसरातील एका आरोपीलाच अॅपच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सप्टेंबर २०२० पूर्वी तडीपार केलेल्या आरोपींची अॅपमध्ये नोंद नसल्यामुळे त्यांच्यावर या अॅपच्या माध्यमातून नजर ठेवता येत नाही. या अॅपच्या माध्यमातून तडीपार केल्यानंतर शहरात येताना आरोपी मोबाइल सोबत आणत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्याचे लोकेशन मिळत नाही. काही वेळ पुण्यात येऊन तडीपार गुंड पुन्हा परत गेल्यानंतर तो मोबाइल वापरतात. पोलिसांकडूनही प्रत्येक तडीपार गुंडाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्यामुळे त्यांचे फावते. त्यामुळे या अॅपचा प्रभावी वापर झाल्यास खरोखरच तडीपार गुंडावर वचक ठेवणे शक्य होईल. एका तडीपार गुंडाला शिक्षा हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुंड विराज यादव याला या एक्स्ट्रा अॅपच्या माध्यमातून तडीपार केले होते. त्याला पुण्याबाहेर सोडताना त्याच्या मोबाइलमध्ये हे अॅप होते. त्याची सेल्फीच्या माध्यमातून दररोज हजेरी घेतली जात होती. एकदा तो तडीपारीचा भंग करून पुणे जिल्ह्यात आल्यानंतर त्याचा ‘अॅलर्ट’ पोलिसांना मोबाइलवर आला. त्यानंतर त्याला तत्काळ अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयानेही त्याची दखल घेऊन त्याला तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. शहरातून तडीपार केलेल्या गुंडाची तपासणी केली जाते. ऍक्स्ट्रा अॅपचा पोलिसांकडून चांगल्या पद्धतीने वापर करून तडीपारांवर नजर ठेवली जाते. सध्या करोनाच्या परिस्थितीत पोलिसांच्या कामाचे स्वरूप थोडे वेगळे आहे; तरीही तडीपार गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून वचक निर्माण केला जात आहे. - श्रीनिवास घाडगे, पोलिस उपायुक्त वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oCJerP