मुंबई: करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात खूप भयाण परिस्थिती आहे. असं असताना अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी गरजू आणि करोनाग्रस्त लोकांना मदत करताना दिसत आहेत. ज्यात सलमान खान, सोनू सूद, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना या कलाकारांचा समावेश आहे. ज्यात आता अभिनेत्री देखील जोडली गेली आहे. करोनाच्या या कठीण काळात जॅकलिन सातत्यानं लोकांना मदत करताना दिसत आहे. जॅकलिनच्या या कामाचं कौतुक आता पुणे पोलिसांनीही केलं आहे. काही दिवसांपूर्वीच जॅकलिननं गरजू लोकांच्या मदतीसाठी YOLO (You Only Live Once) हे फाऊंडेशन सुरू केलं आहे. ज्यातून ती लोकांच्या लॉकडाऊन स्टोरीज सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. पुणे पोलिसांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'पुणे पोलिसांच्या टीमसाठी जॅकलिन फर्नांडिसचं योगदान कौतुकास्पद आहे. तुमच्या या योगदानासाठी खूप आभार. तुम्ही करत असलेली मदत फ्रंटलाइन वर्कर्सना प्रोत्साहन देईल.' पुणे पोलिसांच्या या ट्वीटनंतर जॅकलिननं पुणे पोलिसांना सॅल्यूट करताना आपल्या ट्विटर हॅण्डलवर एक पोस्ट केली होती. तिनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'मी पुणे पोलिसांच्या कामाला सॅल्यूट करते. जे फ्रंटलाइनवर लोकांच्या सुरक्षेसाठी खूप मेहनत घेत आहे. करोनाच्या या संकटाशी लढण्यासाठी आपलं योगदान देत आहेत. आम्ही तुमच्या सोबत आहोत.' जॅकलिन फर्नांडिस मागच्या काही दिवसांपासून अनेक खासगी संस्थासोबत मिळून फ्रंटलाइन वर्कर्सना मदत करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं मुंबईतील रोटी बँकसोबत मिळून १ लाखापेक्षा जास्त लोकांना अन्न पुरवलं. याशिवाय रस्त्यावर बेवारस जनावरांनाही खाऊ घातलं आहे. तसेच फ्रंटलाइवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना तिनं मास्क आणि सॅनेटाइझरही दान केले आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eH6K3n