Full Width(True/False)

ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपने परिपूर्ण 'हे' स्मार्टफोन्स खरेदी करा १० हजारांपेक्षा कमी किमतीत, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली . अनेकांना फोनद्वारे फोटोग्राफी करायला आवडते. हि बाब लक्षात घेता आता बर्‍याच स्मार्टफोन कंपन्या बजेट श्रेणीत दोनपेक्षा जास्त कॅमेरे देत आहेत. तुम्हाला मोबाईलवरून फोटो क्लिक करणे आवडत असेल आणि दोनपेक्षा जास्त कॅमेर्‍यासह एक स्वस्त फोन खरेदी करायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, मोबाईलमध्ये चांगला कॅमेरा हवा असल्यास खूप पैसे मोजण्याची गरज आता नक्कीच नाहीये. जाणून घ्या या स्मार्टफोन्स विषयी. वाचा : पोको सी ३, किंमत: ८,२४९ रुपये पोको सी ३ हा एक उत्कृष्ट बजेट स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात प्रथम १३ एमपी प्रायमरी सेन्सर, दुसरा २ एमपी मॅक्रो लेन्स आणि तिसरा २ एमपी डीपॅथ सेन्सर आहे. तर ,सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या तसेच पोको सी ३ स्मार्टफोनमध्ये ६. ५३ इंच एचडी डिस्प्ले, मीडियाटेक हेलियो जी ३५ प्रोसेसर आणि ५,००० एमएएच बॅटरी मिळेल. विवो यु १० किंमत: ८,९९० रुपये विवो यु १०च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने व्हिवो यू १० मध्ये ६.५३ इंचचा फुल व्यू एचडी प्लस आयपीएस वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर आहे. याशिवाय व्हिवो यू १० मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात १३ एमपी प्रायमरी सेन्सर, ८ एमपी वाइड-अँगल लेन्स आणि २ एमपी बोकेह लेन्स आहेत. याशिवाय फोनच्या पुढील भागामध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी ८ एमपी कॅमेरा आहे ओप्पो ए १५, किंमत: ८,९९० रुपये सेल्फीसाठी ओप्पो ए १५ स्मार्टफोनमध्ये ५ एमपी कॅमेरा आहे. तर युजर्सला डिव्हाइसच्या मागील भागात १३ एमपी प्राइमरी सेन्सर, २ एमपी मॅक्रो लेन्स आणि २ एमपी डीप सेन्सर मिळेल.तसेच यात ६.५३ इंच एचडी प्लस डिस्प्ले, ४,२३० एमएएच बॅटरी आणि मीडियाटेक हेलियो पी ३५ प्रोसेसर आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ ०२ एस किंमतः ८,९९९ रुपये सॅमसंग गॅलेक्सी एफ ०२ एस स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा १३ एमपीचा आहे. इतर दोन सेन्सरविषयी सांगायचे तर यात २ एमपी मॅक्रो लेन्स आणि २ एमपी खोलीचे सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ एमपी कॅमेरा उपलब्ध असेल. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ४ जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, ३.५ एमएम ऑडिओ जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट हे फीचर्स देण्यात आले आहेत. रियलमी सी २५ किंमत: ९,९९९रुपये रियलमी सी २५ स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. यात प्रथम ४८ एमपी प्रायमरी सेन्सर, एक २ एमपी मोनोक्रोम लेन्स आणि तिसरा २ एमपी मॅक्रो शूटर आहे. तर सेल्फीसाठी ८ एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच, ६.५ इंच एचडी प्लस डिस्प्ले, मीडियाटे हेलिओ जी७० प्रोसेसर आणि ६,००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हे डिव्हाइस Android ११ आधारित रियलमी यूआय २.० वर काम करते. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33ZcKhT