Full Width(True/False)

BSNLचा सर्वात स्वस्त ३६५ दिवसांचा प्लान, १४९९ रुपयांत वर्षभर हे फायदे मिळणार, जाणून घ्या

नवी दिल्लीः BSNL Prepaid Plan:टेलिकॉम कंपन्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चढाओढ लागली आहे. सर्व कंपन्या आता स्वस्त प्लान ग्राहकांना ऑफर करीत आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने ग्राहकांसाठी ३६५ दिवसांचा प्लान ऑफर आणली आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना २४ जीबी डेटा मिळतो. BSNLच्या या प्लानचे नाव PV 1,499 आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते तसेच मेसेजची सुविधा दिली जाते. वाचाः BSNLचा १४९९ रुपयांचा प्लान कंपनीचा हा प्लान दुसऱ्या खासगी कंपन्यासारखा म्हणजे जिओ आणि वोडाफोन आयडियापेक्षा स्वस्त प्लान आहे. बीएसएनएलचा हा प्लान त्या ग्राहकांसाठी बेस्ट आहे. ज्यांना डेटा कमी लागतो. या प्लानमध्ये ग्राहकांना ३६५ दिवसांची वैधता मिळते. सोबत अनलिमिटेड कॉलिंग सोबत रोज १०० मेसेज पाठवण्याची सुविधा मिळते. कंपनीच्या १४९९ रुपयांच्या प्लानमध्ये वर्षभरासाठी २४ जीबी डेटा दिला जातो. वाचाः Jio चा २३९९ रुपयांचा प्लान जिओचा २३९९ रुपयांचा प्लान हा एक वर्षाच्या वैधतेसोबत येतो. करोना महामारीत वर्क फ्रॉम होम करीत आहेत. त्या लोकांसाठी हा प्लान चांगला आहे. कारण, या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. ज्यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस मिळते. सोबत माय जिओ, जिओ सिनेमा, जिओ टीव्हीचे अॅक्सेस फ्री मिळते. वाचाः Airtelचा १४९८ रुपयांचा प्लान एअरटेलचा हा प्लान वर्षभरासाठी आहे. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सोबत २४ जीबी डेटा मिळतो. याशिवाय ग्राहकांना १०० एसएमएस दिले जातात. या प्लानमध्ये Zee5 चे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. VIचा २५९९ रुपयांचा प्लान वोडाफोन आयडियाचा २५९९ रुपयांचा प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जात होता. परंतु, आता रोज १.५ जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये ग्राहकांना डिज्नी+हॉटस्टार व्हीआयपीचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wdC5Rh