नवी दिल्लीः Lenovo ने आपल्या लेसेस्ट गेमिंग स्मार्टफोन Legion 2 Pro ला दोन नवीन व्हेरियंट १८ जीबी प्लस २५६ जीबी आणि १६ जीबी प्लस ५६ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. लाँच करण्यात आलेल्या १८ जीबीच्या व्हेरियंटची किंमत चीनमध्ये ४९९९ चिनी युआन म्हणजेच ५६ हजार ७०० रुपये आहे. तर १६ जीबीच्या व्हेरियंटच्या फोनची किंमत ४४९९ चिनी युआन म्हमजेच ५१ हजार रुपये आहे. सुरुवातीला कंपनीने या फोनला १६ जीबी आणि १८ जीबी रॅमच्या ऑप्शनमध्ये आणि ५१२ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत लाँच केले होते. वाचाः ची फीचर्स या गेमिंग स्मार्टफोनमध्ये 1080x2460 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.९२ इंचाचा सॅमसंग E4 AMOLED डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 20.5:9 आहे. हे 144Hz रिफ्रेश रेट सोबत येते. जबरदस्त गेमिंग अनुभवासाठी फोनमध्ये 720Hzचे टच रिस्पॉन्स रेट दिले आहे. १८ जीबी पर्यंत रॅम आमि ५१२ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट ऑफर केले आहे. हेवी गेमिंग दरम्यान फोन गरम होऊ नये यासाठी कंपनी लिक्विड कूलिंग सोबत दोन फॅन देते. वाचाः फोनच्या रियर मध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅश सोबत दोन कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा Omnivision प्रायमरी कॅमेरा सोबत एक १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ४४ मेगापिक्सलचा साइड पॉप अप कॅमेरा दिला आहे. दमदार गेमिंग परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये डॉल्बी एटमॉस साउंड सपोर्ट सोबत गेम मोड दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5500mAh ची बॅटरी दिली आहे. दोन यूएसबी सी पोर्ट आणि ९० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RrnmUa