Full Width(True/False)

स्वस्त ५जी स्मार्टफोन Poco M3 Pro 5G झाला लाँच, किंमत फक्त...

नवी दिल्ली : पोकोने आपला नवीन Poco M3 Pro लाँच केला आहे. कंपनीने ४ जीबी + ६४ जीबी आणि ६ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये फोनला लाँच केले आहे. याच्या ४ जीबी व्हेरिएंटची किंमत १५९ यूरो (जवळपास १४,२०० रुपये) आणि ६ जीबी व्हेरिएंटची किंमत १७९ यूरो (जवळपास १६ हजार रुपये) आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी प्रोसेसर, 90Hz डिस्प्ले, ट्रिपल रियर कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग सारखे फीचर्स मिळतील. कंपनीने या स्मारफोनला - पॉवर ब्लॅक, कूल ब्लू आणि येलो रंगात उपलब्ध केले आहे. वाचाः 5जी चे फीचर आणि स्पेसिफिकेशन फोनमध्ये १०८०x२४०० पिक्सल रिझॉल्यूशनसोबत ६.५ इंचाचा फूल एचडी प्लस IPS LCD पॅनेल देण्यात आला आहे. डिस्प्लेता आस्पेक्ट रेशियो २०:९ आणि रिफ्रेश रेट ९०Hzआहे. फोनची खास गोष्ट म्हणजे हा डायनॅमिक स्विच टेक्नोलॉजीसोबत येतो. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसोबत येणाऱ्या फोनमध्ये डिस्प्ले पंच-होल डिझाइन आहे, मात्र बेजल अधिक जाड आहेत. वाचाः ६ जीबी पर्यंतची रॅम आणि १२८ जीबी पर्यंतच्या इंटर्नल स्टोरेजच्या या फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 700 चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत २ मेगापिक्सलचा एक मॅक्रो लेंस आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी ५०००एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. जी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. यात कंपनीने अँड्राइड ११ वर आधारित MIUI १२ ओएस सिस्टम दिले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, एनएफसी, 5G, ३.५mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स मिळतील. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33ZtLbJ