मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री तिच्या वादग्रस्त विधानांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या वादग्रस्त विधानांमुळे मागच्या वर्षी तिचं ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलं. त्यानंतर आता नुकतंच अभिनेत्री कंगना रणौतचंही ट्वीटर अकाउंट बंद करण्यात आलं आहे. ज्यावर पायलनं राग व्यक्त केला आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भडकलेली दिसत आहे. आपल्या व्हिडीओमध्ये पायल रोहतगीनं रडत रडत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावर राग व्यक्त केला आहे. ती म्हणते, 'मागच्या काही काळापासून मला असहाय्य वाटत आहे. अनेक समस्या असूनही मी स्वतःला खंबीर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण जर मी असं केलं नाही तर माझ्यासोबत अनेक वाईट गोष्टी घडू शकतात. सर्वांनाच मी खूप खंबीर असल्याचं दिसतं. पण मला जेव्हा योग्य सल्ला मिळत नाही तेव्हा खूपच असहाय्य वाटतं. सध्या पश्चिम बंगालमधून जे फोटो सोशल मीडियावर मी पाहत आहे. ते पाहिल्यानंतर ती आपण खूपच लाचार असल्याची भावना मनात येत आहे.' पायल पुढे म्हणते, 'सरकार नक्की काय करत आहे. मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात ना? अमित शाहजी तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात ना? मग ज्यांनी तुम्हाला पाठींबा दिल्या अशा निष्पाप हिंदूंची बळी का जात आहे. तुम्ही सत्तेत आलात नाही. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. पण मग त्या निरपराध लोकांची काय चूक आहे. ज्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला.' पायल रोहतगीनं या व्हिडीओमध्ये कंगनाच्या बंद करण्यात आलेल्या ट्विटर अकाउंटच्या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे. ती म्हणाली, 'कंगनाचं ट्विटर अकाउंट का बंद करण्यात आलं. तिनं असं काही चुकीचं तर लिहिलं नसेल. पश्चिम बंगालमध्ये तुमचं सरकार नसलं तरी मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात मग त्यांना वाईट प्रकारे मारलं जात आहे, ज्या महिलांवर बलात्कार होत आहे. अशांना तुम्ही का वाचवू शकत नाही.' पायल तिच्या व्हिडीओमध्ये पुढे म्हणते, 'ममता बॅनर्जी तुम्ही निवडणूक जिंकलात. पण तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात. तुम्ही हे फोटो पाहिले नाहीत का? माणूसकी म्हणून त्यांना तुम्ही वाचवू शकत नाही का? हे सर्व कोण करत आहेत. हे करणारी माणसं तर तुमचीच आहेत. हे ठीक नाही आहे. देव पाहत आहे. यावर जर काहीच कारवाई केली नाहीत या सर्वांच्या मृत्यूला तुम्हीच जबाबदार असणार आहात मोदीजी आणि अमित शाहजी.' अभिनेत्री कंगना रणौतचं ट्विटर अकाउंट ४ मे ला कायम स्वरूपी बंद करण्यात आलं. कंगनानं पश्चिम बंगाल निवडणूकांनंतर ममता बॅनर्जी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. याशिवाय तिथं होत असलेल्या हिंसाचाराचाही उल्लेख आपल्या ट्वीटमध्ये केला होता. कंगनाच्या या ट्वीटमुळे ट्वीटर तिच्यावर कारवाई करत तिचं अकाउंट कायमी स्वरुपी बंद केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eYMVmZ