नवी दिल्ली . तुम्हाला एखाद्या फिचर फोनवरून अपग्रेड करायचं आहे. पण, बजेट मात्र ५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे तर टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. ५००० रुपयांमध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोन्स शोधण्यात आम्ही तुमची मदत करु. किंमत जरी कमी असली तरी आवश्यक ते सर्व फीचर्स या स्मार्टफोन्समध्ये आहेत. जाणून घ्या या फोन्सविषयी विस्तृतपणे. वाचा : itel A25: किंमत ३,९९९ रुपये आयटीईएल ए २५ मध्ये अँड्रॉइड ९.० ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहे. या फोनची स्क्रीन५ इंचची आहे. हँडसेटमध्ये १४ गीगाहर्ट्झ क्वाड-कोर प्रोसेसर आहे. फोनमध्ये १ जीबी रॅम आणि १६ जीबी एक्सपेंडेबल स्टोरेज आहे. फोनला अधिक बळकटी देण्यासाठी ३०२० mAh बॅटरी देण्यात आली आहे. आयटीईएलच्या या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा रियर आणि २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. लावा मोबाईल झेड 41: किंमत ३,८९९ लावाच्या या फोनने अँड्रॉइड ९.० दिला आहे. फोनचे रियर ५ मेगापिक्सल आहे तर २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा. स्मार्टफोनमध्ये ५ इंच स्क्रीन आणि १.४ गीगाहर्ट्झ क्वाड-कोर प्रोसेसर आहे. फोनमध्ये १ जीबी रॅम आणि १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. स्टोरेज १२८ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. हँडसेटमध्ये २५०० mAh बॅटरी देण्यात आली आहे. शाओमी रेडमी गो 16 जीबीः किंमत ४,४९९ रुपये शाओमीच्या या फोनमध्ये ५ इंचचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये १.४ गीगाहर्ट्झ क्वाड-कोर प्रोसेसर आहे. हँडसेटमध्ये १ जीबी रॅमसह १ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रीअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. फोनमध्ये ३००० mAh बॅटरी आहे. सॅमसंग गॅलेक्सी M01 कोअर 16 जीबीः किंमत ५,१९९ रुपये या सॅमसंग फोनमध्ये १ जीबी रॅम आणि १६ जीबी एक्सपेंडेबल स्टोरेज आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ३००० mAh बॅटरी आहे. हँडसेटमध्ये ८मेगापिक्सलचा रीअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये १.५ गीगाहर्ट्झ मीडियाटेक एमटी ६७३९ क्वाड-कोर प्रोसेसर आहे. सॅमसंगच्या या हँडसेटमध्ये ५.३ इंच एचडी + स्क्रीन आहे. पॅनासोनिक एलुगा आय 6: किंमत ४,९१३ रुपये हा फोन Amazon इंडियाकडून खरेदी करता येईल. फोनमध्ये ५.४५ इंचचा डिस्प्ले आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हँडसेटमध्ये ८ मेगापिक्सलचा रीअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. अँड्रॉइड ९ सह येणारा पॅनासोनिक फोन क्वाड-कोर १.५ गीगाहर्ट्झ प्रोसेसरसह आहे. स्मार्टफोनमध्ये ३००० mAh बॅटरी आहे. स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज असून ते मायक्रोएसडी कार्डद्वारे २५६ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wcs9aL