नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट २०२१ अखेर पर्यंत १० हजार नव्या नोकऱ्या निर्माण करणार आहे. कंपनी ब्रिटनमध्ये या नोकऱ्या देणार असून, यामुळे कंपनीची ब्रिटनमधील कर्मचारी संख्या ५५ हजारांपेक्षा अधिक होणार आहे. वाचा : अॅमेझॉनच्या या घोषणेमुळे आता ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ब्रिटनमधील बेरोजगारीचे प्रमाण सध्या ५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या नवीन नोकऱ्या ऑपरेशन्स नेटवर्क, कॉर्पोरेट ऑफिस आणि अॅमेझॉन वेब सर्व्हिसमध्ये असतील. कंपनीची सेंटर इंग्लंड येथील हिन्कले येथे नवीन सेंटर सुरू करण्याची योजना आहे. यामुळे ७०० जणांना रोजगार मिळेल. याशिवाय उत्तर इंग्लंडमध्ये पार्सल सेंटर, लंडनजवळ एक सेंटर आणि स्विंडन येथे सेटर सुरू करण्याचा कंपनीचा विचार असून, यामुळे १३०० जणांना कायमस्वरुपी नोकऱ्या मिळतील. वाचा : ग्राहकांच्या ऑर्डर तयार करणे, पोहचवणे यासंदर्भातील नोकऱ्या इंजिनिअरिंग, मानव संसाधन, आयटी आणि वित्त क्षेत्रात निर्माण होतील. तसेच, कॉर्पोरेटमधील नोकऱ्या फॅशन, डिजिटल मार्केटिंग, इंजिनिअरिंग, व्हिडीओ प्रोडक्शन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्लाउड कॉम्प्युटिंग, एआय आणि मशीन लर्निंग यामध्ये असतील, अशी माहिती कंपनीने दिली. तसेच, कंपनीने पुढील ३ वर्षात जवळपास ५ हजार कर्मचाऱ्यांना नवीन प्रशिक्षण देण्यासाठी १० मिलियन पाउंडची देखील घोषणा केली आहे. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yaXCf3