नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे ऑक्सिमीटरची मागणी प्रचंड वाढली आहे. परंतु, ही मागणी वाढताच त्याच्या उपलब्धतेत कमतरता जाणवू लागली आहे. लोकांना हे डिव्हाइस वेळेवर मिळताना दिसत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त स्मार्टवॉच संबंधी खास माहिती सांगणार आहोत. ज्यात तुम्हाला SpO2 सेंसर मिळू शकतो. या सेन्सरने तुम्ही तुमचे ब्लड ऑक्सिजनची लेवलला ट्रॅक करू शकता. जाणून घ्या या स्वस्त स्मार्टवॉच संबंधी. वाचाः Fire-Boltt BSW001 या स्मार्टवॉचची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टवॉच मध्ये SpO2 सेंसर मिळते. या वॉच मध्ये १.४ इंचाचा डिस्प्ले दिले आहे. याचे रिझॉल्यूशन 240*240 पिक्सल आहे. याशिवाय, या वॉच मध्ये ७ स्पोर्ट मोड मिळतील. ज्यात सायकलिंग आणि रनिंग सारख्या अॅक्टिवेटचा समावेश आहे. वाचाः CrossBeats ACE याची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. यात कमी किंमतीत SpO2 सेंसर मिळते. तुम्हाला स्वस्तात स्मार्टवॉच खरेदी करायची असेल तर ही बेस्ट आहे. या स्मार्टवॉच मध्ये १.३ इंचाचा आयपीएस डिस्प्ले दिला आहे. सोबत यात २५० हून अधिक वॉच फेस आणि कॉल मेसेज नोटिफिकेशन्स सारखे फीचर्स मिळतात. याशिवाय, स्मार्टवॉच मध्ये दमदार बॅटरी दिली आहे. सिंगल चार्ज मध्ये १५ दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप देते. वाचाः AeoFit Alpha या स्मार्टवॉचची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टवॉच सिल्वर, गोल्ड आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहेत. या स्मार्टवॉच मध्ये हार्ट आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटर करणारे सेन्सर दिले आहे. याशिवाय, युजर्संना स्मार्टवॉच मध्ये वॉकिंग, रनिंग आणि हायकिंग सारखे स्पोर्ट मोड मिळतात. अन्य फीचर्स मध्ये फुल टच डिस्प्ले आणि दमदार बॅटरी दिली आहे. सिंगल चार्ज मध्ये ७ दिवस बॅटरी बॅक अप देते. वाचाः Amazfit Bip U यास्मार्टवॉच मध्ये SpO2 सेंसर मिळते. याची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टवॉच मध्ये १.४३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 320x302 पिक्सल आहे. सोबत डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी २.५ डी कॉर्निंग गोरिला ग्लास ३ चे प्रोटेक्शन दिले आहे. याशिवाय, ५० हून जास्त वॉच फेस आमि ६० हून जास्त स्पोर्ट मोड दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3twHYr2