मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आज ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. माधुरी दीक्षित बॉलिवूडची अशी अभिनेत्री होती. जिच्या सौंदर्यासमोर हिरोचा चार्मसुद्धा कमी पडत असे. तिच्या अभिनय आणि सौंदर्याचे लाखो चाहते आजही आहेत. करिअरच्या सुरुवातीला तिचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले मात्र त्यानंतर माधुरीनं एका मागोमाग एक अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण यासाठी तिला मोठी किंमत चुकवावी लागली होती. अविवाहित असूनही माधुरीला त्यावेळी 'नो प्रेग्नन्सी' क्लॉज साइन करावा लागला होता. माधुरी दीक्षितने १९८४ मध्ये आलेल्या 'अबोध' या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. पण तिला खरी ओळख मिळाली ती ४ वर्षांनंतर आलेल्या 'तेजाब' चित्रपटातून. या चित्रपटाच्या यशानंतर माधुरीनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. माधुरी दीक्षित आणि अभिनेता यांची जोडी बॉलिवूडमध्ये बऱ्याच मोठ्या काळासाठी दमदार जोडी म्हणून गाजली. या दोघांनी 'खलनायक' ते 'महात्मा'पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ९०च्या दशकात तर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा बी-टाऊनमध्ये सुरू झाल्या होत्या. अशात माधुरीला आपला स्टारडम वाचवण्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, माधुरी दीक्षित अविवाहित असूनही तिला चित्रपटांसाठी 'नो प्रेग्नन्सी' क्लॉज साइन करावा लागला होता. त्यावेळी माधुरी दीक्षित सर्वात आघाडीची आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. तिचा प्रत्येक चित्रपट हिट होत होता. एवढंच नाही तर माधुरी आणि संजय दत्त यांचे सर्वच चित्रपट सुपरहिट झाले होते. संजय दत्त आण माधुरी यांच्यात ज्या पद्धतीनं जवळीक वाढत असलेली पाहायला मिळत होती. ते पाहता अने निर्मात्यांच्या मनात भीती वाढू लागली होती. त्यांना वाटत होतं की, जर या दोघांनी लग्न केलं तर किंवा माधुरी दीक्षित प्रेग्नन्ट झाली तर. संजय दत्त त्यावेळी विवाहित होता. पण त्याची पत्नी त्यावेळी परदेशात होती. आणि तो जास्तीत जास्त वेळ माधुरीसोबत व्यतित करताना दिसत होता. दोघंही तासंतास एकमेकांसोबत वेळ घालवत असत. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूडमध्ये जोरदार सुरू होत्या. ज्यामुळे दिग्दर्शक सुभाष घईंनी माधुरीकडून नो प्रेग्नन्सी क्लॉज साइन करुन घेतला होता. 'खलनायक' चित्रपटासाठी माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि सुभाष घई एकत्र काम करत होते. त्यामुळे सुभाष घईंना वाटत होतं की, जर तिनं संजयशी लग्न केलं किंवा प्रेग्नन्ट झाली तर चित्रपटाचं शूटिंग थांबेल. याचा विचार करून त्यांनी माधुरीला नो प्रेग्नन्सी क्लॉज साइन करून घेतला. जेणेकरून जर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान माधुरी प्रेग्नन्ट झाली तर तिला मोठी रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार होती. कोणत्याही अभिनेत्रीकडून अशाप्रकारचं कॉन्ट्रॅक्ट साइन करवून घेणारे सुभाष घई हे पहिले दिग्दर्शक होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tPljX4