Full Width(True/False)

सलमानच्या घराबाहेर शूट झाला आहे 'राधे'मधील १५ मिनिटांचा सीन

मुंबई: अभिनेता आणि यांच्या मुख्य भूमिका असलेला '' चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आणि या चित्रपटानं रिलीज होताच इतिहास रचला आहे. 'झी ५' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला हा चित्रपट आतापर्यंत ४२ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. एकीकडे या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे चित्रपटाशी संबंधीत एक रंजक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार 'राधे'मधील एक १५ मिनिटांचा सीन हा सलमान खानच्या घराबाहेर शूट करण्यात आला आहे. राधे चित्रपटात एक १५ मिनिटांचा सीन आहे जो सलमान खानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या बाहेर शूट करण्यात आला आहे. ज्यात सलमान खानची दमदार एंट्री होते. या चित्रपटात सलमान खाननं राधे या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ज्याची कार अर्ध्या रस्त्यात खराब होते. त्यानंतर दिशा पाटनी तिच्या वोक्सवॅगन बीटल कारने तिथे येते. या चित्रपटात दिशाचं नाव दिया आहे. राधे पहिल्याच नजरेत दियाच्या प्रेमात पडतो आणि तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यावर चालू लागतो. त्यावेळी दिया कार थांबवते आणि राधेला लिफ्ट देते. ज्यावेळी दिया ड्राइव्ह करत असते तेव्हा तिला तिचा एसीपी भाऊ अविनाश अभ्यंकर (जॅकी श्रॉफ)चा फोन येतो. जो दियाला मॉडेलिंग करत असताना शॉर्ट ड्रेस घालण्यावरून ओरडत असतो. त्यावर दिया त्याला सांगते की, पोलीसांची नोकरी त्याच्यासाठी चांगली नाही आणि ती पोलीसांचा तिरस्कार करते. राधे दियाचं बोलणं ऐकतो आणि तिला पोलीस आवडत नाही हे समजल्यावर स्वतः मॉडेल असल्याचं सांगतो. त्यानंतर दिया त्याला कुठे सोडायचं हे विचारतो तेव्हा म्हणतो, 'गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या इथे सोड.' तो तिला खोटं बोलतो की, तो गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला राहतो. दिया त्याला त्या ठिकाणी सोडून निघून जाते. या सीननंतर सलमान खानची तुलना शाहरुख खानशी केली जात आहे. यामागचं कारण म्हणजे शाहरुख खाननं त्याच्या 'फॅन' चित्रपटाचे काही सीन त्याच्या 'मन्नत' बंगल्यासमोर शूट केले होते. खासकरून तो त्याच्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना आपल्या बाल्कनीमधून धन्यवाद देतो. त्याच्या वाढदिवशी अनेक चाहते त्याच्या घराबाहेर गर्दी करतात. त्यामुळे 'फॅन'मधील काही सीन याच बाल्कनीतून शूट करण्यात आले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3flLVJU