Full Width(True/False)

'दृश्यम २' चित्रीकरणाआधीच अडचणीत, निर्मात्यांवर खटला दाखल

मुंबई: मल्याळम चित्रपट ''च्या हिंदी रिमेकचे राइट्स पॅनोरमा स्टुडिओजने विकत घेतल्याची निर्माते कुमार मंगत यांनी घोषणा केली होती. पण यानंतर ही चित्रपट कायदेशीर अडचणींमध्ये फसल्याचं बोललं जात आहे. 'दृश्यम २'च्या हिंदी रिमेकचे राइट्स विकत घेतल्याची घोषणा निर्मात्यांनी केल्यानंतर 'दृश्यम'ची सह-निर्माता कंपनी वायकॉम- १८ मोशन पिक्चर्सनं निर्माता कुमार मंगत यांच्यावर या राइट्सच्या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. अजय देवगण, , श्रीया सरन आणि इशिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'दृश्यम' २०१५ मध्ये रिलीज झाला होता. ज्याचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. तर निर्मिती कुमार मंगत यांचा पॅनोरमा स्टुडिओज आणि वायकॉम १८ मोशन पिक्चर यांची होती. त्यामुळे आता 'दृश्यम २'च्या राइट्सवर फक्त कुमार मंगत यांचा अधिकार असू शकत नाही असं वायकॉम १८ चं म्हणणं आहे. ई-टाइम्सला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'कुमार मंगत हे वायकॉम १८ अशाप्रकारे प्रोजेक्टमधून वेगळं करू शकत नाहीत असं वायकॉम १८ मोशन पिक्चर्सने म्हटलं आहे. ते एकटे किंवा इतर कोणासोबत मिळून 'दृश्यम २' करू शकत नाही असंही वायकॉम १८चं म्हणणं आहे.' जेव्हा कुमार मंगत यांनी एकट्यानंच या चित्रपटाची घोषणा केली त्यानंतर वायकॉम १८ मोशन पिक्चर्सनं त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान कुमार मंगत यांनी वायकॉम १८सोबतच्या वादावर कोणातीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अर्थात त्यांची कंपनी या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. तर वायकॉम १८ मोशन पिक्चर्सकडून यावर कोणतीही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेला 'दृश्यम २' काही महिन्यांपूर्वीच रिलीज झाला आहे. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3f9zp0f