Full Width(True/False)

VI ने बदलले हे प्लान, आता १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि Hotstar स्ट्रीमिंग फ्री

नवी दिल्लीः देशातील प्रसिद्ध नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनी ने २५९५ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केले आहेत. या प्लानमध्ये आधी रोज २ जीबी डेटा मिळत होता. आता यात कमी करून रोज १.५ जीबी डेटा देण्याचे कंपनीने ठरवले आहे. या प्लानमध्ये वार्षिक स्ट्रिमिंग बेनिफिट्स मिळत आहे. आता २५९५ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ३६५ दिवसांच्या वैधतेसोबत रोज १.५ जीबी डेटा दिला जाणार आहे. वाचाः या प्लानमध्ये आता Dinsey+ Hotstar स्ट्रीमिंग बेनिफिट्स दिले जात आहे. अन्य फायद्यात या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि SMS मिळतात. अतिरिक्त फायद्यात या प्लानमध्ये विकेंड डेटा रोलओवर बेनिफिट, अनलिमिटेड हाय स्पीड नाइट टाइम डेटा आणि Vi मूवीज आणि TVचे अॅक्सेस मिळते. Vodafone Idea चा अन्य २३९९ रुपयांचा वार्षिक प्लानमध्ये युजर्संना रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये अनलिमिटे़ड व्हॉइस कॉलिंग आणि SMS मिळतात. अतिरिक्त फायदा म्हणून या प्लानमध्ये Zee5 Premium चे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः Vodafone Idea चा १४९९ रुपयांच्या वार्षिक प्लानमध्ये युजर्संना २४ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि SMS ची सुविधा मिळते. या प्लानमध्ये रोजच्या डेटासोबत Disney+ Hotstar चे अॅक्सेस मिळते. Airtel चा २६९८ रुपयांचा प्लान एअरटेलचा २६९८ रुपयांचा वार्षिक प्रीपेड प्लान आहे. युजर्संना यात रोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० SMS मिळतात. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये Disney+ Hotstar चे एक वर्षाचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन मिळते. Jio चा २५९९ रुपयांचा प्लान या वार्षिक प्लानमध्ये युजर्संना रोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. यात Disney+ Hotstar चे एक वर्षासाठी व्हीआयपी सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xQhST1