मुंबई : काही दिवसांपूर्वी सलमान खानचा '' हा प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर लगेचच या सिनेमाची पायरेटेड कॉपी आल्याचे समोर आले. त्यानंतर तातडीने निर्मात्यांनी याविरोधात मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, हा सिनेमा ५० रुपयांमध्ये व्हॉट्सअपद्वारे विकला जात असल्याचे समोर आले. खुद्द सलमान खानने सिनेमाच्या पायरसीच्याविरोधात आवाहन केले होते. त्याने लोकांना पायरसीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्र या, असे सांगितले होते. या आवाहनानंतरही या सिनेमाची पायरेटेड कॉपी सोशल मीडियावर विकली जात होती. पाच भागांमध्ये विकला जातो पायरेटेड सिनेमा 'राधे' च्या निर्मात्यांनी पायरसीविरोधात मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखलकेली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता एका फेसबुक युझरने हा सिनेमा अवैधरित्या हा सिनेमा डाऊनलोड केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्या फेसबुक युझर विरोधात फिल्म्सच्या मार्केटिंग हेड अपर्णा देसाई यांनी पोलिसांकडे केला. 'राधे...' हा सिनेमा अवैधरित्या व्हॉट्सअॅपवर पाच भागांमध्ये उपलब्ध आहे. पोलिस करत आहे तपास मिळालेल्या माहितीनुसार, सायबर पोलिस अद्याप तपास करत आहेत. हा सिनेमा ज्या ऑनलाईन साईटवरून डाऊनलोड केले जात आहे, त्या सोर्सचा पोलिस तपास करत आहेत. हे व्हर्जन व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवरून प्रसारित केले जात आहे. सलमानच्या चाहत्यांना आवडला सिनेमा सलमानच्या 'राधे...' सिनेमाचे समीक्षण नकारात्मक आले आहे. परंतु या कोणत्याही परीक्षणांचा परिणाम सलमानच्या चाहत्यांवर झालेला नाही. त्यांना हा सिनेमा खूपच आवडला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रभू देवाने केले आहे. तर या सिनेमात सलमानबरोबर दिशा पटणी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा आणि गौतम गुलाटी हे कलाकार आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ovzGyN