मुंबई- मराठमोळा अभिनेता बॉलिवूडमधील एक गाजलेलं नाव आहे. श्रेयसने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं. '' आणि 'डोर' हे श्रेयसच्या कारकिर्दीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहेत. नागेश कुकनूर यांच्या 'इकबाल' मध्ये श्रेयसने केलेल्या अभिनयाला तोडच नाही. चित्रपटात श्रेयसने एका १७- १८ वर्षाच्या मुलाची भूमिका साकारली होती. जो आपल्या क्रिकेटर बनण्याच्या स्वप्नांसाठी दिवसरात्र मेहनत करतो. परंतु, हा चित्रपट मिळवण्यासाठी श्रेयसला अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं. एक वेळ अशी होती जेव्हा श्रेयसला चित्रपटासाठी त्याचं लग्नच रद्द करायला सांगितलं गेलं. वरवर साध्या दिसणाऱ्या 'इकबाल' च्या भूमिकेसाठी श्रेयसला प्रचंड मेहनत घ्यायला लागली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने खुलासा केला होता की, चित्रपटासाठी त्याला त्याचं लग्न रद्द करावं लागणार होतं. श्रेयस म्हणाला, ''इकबाल' च्या चित्रीकरणाआधी मी नागेश यांच्याकडे एका दिवसाची सुट्टी मागितली. तारीख होती ३१ डिसेंबर. त्याच दिवशी नागेश पार्टी ठेवणार होते आणि त्याच दिवशी माझं लग्न होतं. मी त्यांना लग्नाचं सांगितल्यावर त्यांनी मला लग्न रद्द करण्याचा सल्ला दिला. मी त्यांना म्हणालो की, मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे ज्याच्या लग्नाच्या पत्रिका वाटल्या गेल्यात. अशात तुम्ही मला लग्न रद्द करायला सांगताय. मी त्यांना खूप समजावलं. अखेरीस मी त्यांना म्हटलं हे लग्न लपवून ठेवलं जाईल फक्त मला एका दिवसाची सुट्टी द्या.' श्रेयस पुढे म्हणाला, 'मी कुणालाच माझ्या लग्नाबद्दल सांगितलं नव्हतं. सुभाष घई यांनादेखील काहीही माहीत नव्हतं. जेव्हा दीप्ती चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या वेळेस वारंवार कार्यक्रमासाठी येऊ लागली तेव्हा त्यांनी नागेश यांना विचारलं ही कोण आहे? त्यावर नागेश यांनी सुभाष यांना सांगितलं ही श्रेयसची पत्नी आहे. त्यांना विश्वास बसत नव्हता कारण त्याच्यासाठी मी फक्त १७- १८ वर्षाचा मुलगा होतो आणि दीप्ती नागेश यांची बहीण बनून प्रीमियरला हजेरी लावायची.'लग्नाच्या वेळेस श्रेयस २९ वर्षांचा होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eNV52T