Full Width(True/False)

रेमडेसिवीरच्या काळाबाजारावरून आर. माधवन संतापला, म्हणाला

मुंबई : देशामध्ये उसळलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात सर्वजण मिळून लढा देत आहोत. या करोनाला हरवण्यासाठी जमेल ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. या संकटकाळात एकीकडे रुग्णांना आवश्यक असलेली औषधे, ऑक्सिजन मिळवण्यासाठी त्यांचे नातेवाईक जीवाचा आटापिटा करत आहेतय तर दुसरीकडे काही लोक याच औषधांचा काळाबाजार करत आहेत. औषधांचा काळाबाजार करणाऱ्या लोकांवर कमालीचा संतप्त झाला असून त्याने सोशल मीडियावर अशा लोकांची चांगलीच झाडाझडती घेतली आहे. भारतात लाखो लोकांना करोनाची बाधा झाली आहे. हजारो जीव अपुऱ्या सुविधांमुळे मरत आहेत. हॉस्पिटलमधील बेड, रेमडिसिवीरसारखी इंजेक्शन, ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. आपल्या आजारी माणसाला हे सर्व औषधं योग्य वेळी मिळावी यासाठी त्यांचे नातेवाईक सोशल मीडियावरून मदत मागत आहेत. अशी सर्व विदारक परिस्थितीमध्ये ऑक्सिजन आणि इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. या आवश्यक गोष्टी दुप्पट किंमतीमध्ये गरजू लोकांना विकल्या जात आहेत. ही अशी कामे करणाऱ्या लोकांवर आर. माधवन कमालीचा संतापला आहे. त्याने आपला हा संताप ट्वीट करून व्यक्त केला आहे. आर. माधवनने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, 'फ्रॉड अर्लट, लोकांनो सजग रहा. मिस्टर अजय अग्रवाल तीन हजार रुपयामध्ये रेमडेसिवीर औषध विकत आहे. हा तुमच्याकडे आयएमपीएसच्या माध्यमातून आधी पैसे देण्यास सांगतो आणि असेही सांगतो की पॅन इंडियाच्या माध्यमातून तीन तासांत तुमच्यापर्यंत औषध पोहोचवले जाईल आणि त्यानंतर तो फोन उचलणार नाही. अशा प्रकारच्या घोटाळ्यांपासून सावध रहा. ही व्यक्ती फ्रॉड आहे. हे लोक माझ्यापर्यंतही आले होते. कृपया सावधगिरी बाळगा. आपल्यातच, आपल्या सभोवती असे राक्षस आहेत... ' अलिकडेच आर. माधवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये आर. माधवनची पत्नी गरीब विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचे सांगितले. माधवनची पत्नी घरातूनच व्हिडीओच्या माध्यमातून गरिब मुलांना शिकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत माधवनने लिहिले की, 'जेव्हा तुमची बायको तुम्ही किती लहान आहात याची जाणीव करून देते.' आर. माधवनच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे तर, 'रॉकेट्री; द नंबी इफैक्ट' या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या सिनेमामध्ये माधवनने वैज्ञानिक नंबी नारायण यांची भूमिका साकारत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QEJDxo