मुंबई : भारतामध्ये करोनाची दुसरी लाट पसरली असून यामुळे रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. परिणामी देशातील आरोग्य यंत्रणेवर याचा ताण पडत असून गरजूंना उपचार मिळत नसल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार मदतीसाठी पुढे आले आहेत. अभिनेत्री आणि तिचा नवरा हेही भारताला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. दोघांनी आपल्या चाहत्यांना मदतीसाठी आवाहन केलं होतं. या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी केलेल्या मदतीबद्दल प्रियांकाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सर्वांचे आभार मानले आहे. प्रियांकाने आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या कठीण प्रसंगामध्ये मदत केलेल्या सर्व लोकांचे प्रियांकाने आभार मानले आहेत. आतापर्यंत त्यांच्या आवाहनाला २ कोटी ५० लाखांहून अधिक मदत मिळाली आहे. प्रियांका चोप्राने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे, 'टुगेदर ऑफ इंडिया' तुम्ही सर्वांनी केलेल्या मदतीबद्दल, दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि आर्थिक मदतीसाठी मनापासून धन्यवाद. तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे भारतामध्ये वाढणाऱ्या करोनाला अटकाव करण्याच्या मोहिमेला बळ मिळणार असून त्यातून मोठा बदल घडून येणार आहे. मला आशा आहे की आपण ज्या वेगाने ही मदत गोळा केली आहे, ती यापुढेही याच वेगाने केली जाईल. प्लीज आर्थिक मदत करा.' प्रियांका चोप्राने लोकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी तिने सांगितले की, ' जोपर्यंत सर्वजण सुरक्षित होत नाही तोपर्यंत आपण कुणीही सुरक्षित राहू शकत नाही. माझे ६३ मिलीयन फॉलोअर्स आहेत. त्यातील प्रत्येकाने जरी १० डॉलर्स दिले तरी १ मिलीअन डॉलर्स जमा होऊ शकतात. ही मोठी रक्कम आहे. जमा झालेला सर्व पैशांचा उपयोग भारतामधील कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर आणि ऑक्सिजन प्लान्ट निर्मितीसाठी केला जाईल.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3umr2EZ