मुंबई- बॉलिवूडमध्ये एकमेकांसोबत काम करताना अनेकांना त्यांचं प्रेम गवसतं. कधी ते प्रेम चिरकाळ टिकतं तर कधी या कलाकारांचा प्रवास अर्ध्यावरच संपतो. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या साथीदारापासून वेगळं होण्याचं निर्णय घेतला. कोणी दुसरं लग्न केलं तर कोणी घटस्फोट न घेताच पतीपासून दूर राहू लागलं. यात लोकप्रिय अभिनेत्री आणि यांच्या जोडीचाही समावेश होतो. अशाच काही जोड्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. १. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया बॉलिवूडच्या सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेल्या जोडींमध्ये राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचा समावेश होतो. १९७२ साली त्यांनी लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षांनंतर म्हणजे १९८३ साली डिंपल कपाडिया राजेश खन्ना यांच्यापासून वेगळ्या राहू लागल्या. परंतु, त्यांनी घटस्फोट कधीच घेतला नाही. २०१२ साली राजेश याचं निधन झालं. २. गुलजार आणि राखी गुलजार हे बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक आहेत. तर राखी हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्रींपैकी एक आहेत. दोघांनी १९७३ साली लग्नगाठ बांधली होती परंतु, लग्नाच्या एका वर्षातच मुलीच्या जन्मानंतर ते वेगळे झाले होते. त्यांनी मिळून मुलीचं पालन पोषण केलं. पण दोघं एकत्र कधी राहिले नाहीत पण घटस्फोटही घेतला नाही. ३. आणि नीलकांती पाटेकर नाना पाटेकर यांच्या पत्नीचं नाव नीलकांती असून त्या पुण्याच्या राहणाऱ्या आहेत. नाना आणि नीलकांती यांचं १९७८ साली लग्न झालं होतं. त्यांची पहिली भेट नाट्यप्रयोगाच्या दरम्यान झाली होती. गेली अनेक वर्ष ते एकमेकांपासून दूर राहत आहेत. परंतु, त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. ४. मोहम्मद अजहरुद्दीन आणि संगीता बिजलानी माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन आणि संगीता बिजलानी यांनी १९९६ साली लग्न केलं होतं. अझर यांच्याशी लग्नासाठी संगीता यांनी इस्लाम कबुल करून स्वतःचं नाव आयशा ठेवलं होतं. २०१० साली दोघे घटस्फोट न घेता वेगळे झाले. ५. पुलकित सम्राट आणि श्वेता रोहिरा बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांची मानलेली बहीण श्वेता रोहिरा हिचं लग्न बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट सोबत झालं होतं. नोव्हेंबर २०१४ साली त्यांनी लग्नगाठ बांधली होती. परंतु, लग्नाच्या एका वर्षातच त्यांच्यात वाद झाले आणि २०१५ साली त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wbbLHu