Full Width(True/False)

नोकियाचा आणखी एक स्मार्ट फीचर फोन लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

नवी दिल्लीः Launch: HMD Global ने आपला नवीन फोन लाँच केला आहे. या फोनचे नाव Nokia 2720 V Flip आहे. या डिव्हाइसला अमेरिकेच्या मार्केटसाठी बनवण्यात आले आहे. जे व्हेरिजॉन ४ जी नेटवर्कवर काम करतो. याच्या नावावरून अंदाज येऊ शकतो की, यात फ्लिप डिझाइन उपलब्ध करण्यात आले आहे. हा एक स्मार्ट फीचर फोन आहे. हे Nokia 2720 Flip फोनचे व्हेरियंट आहे. हा फोन KaiOS वर काम करतो. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः 2720 V Flipची किंमत अमेरिकी मार्केट मध्ये याची किंमत ८० डॉलर म्हणजेच जवळपास ५ हजार ९०० रुपये आहे. याला २ मे पासून सेलसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या फोनला अमेरिकेबाहेर लाँच केले जाणार की नाही, याची माहिती कंपनीने अद्याप दिली नाही. वाचाः Nokia 2720 V Flip चे फीचर्स या फोनमध्ये १.३ इंचाचा एक्सटर्नल डिस्प्ले दिला आहे. हा कॉलर आयडी, तारीख आणि वेळ दाखवतो. तर २.८ इंचाचा मेन स्क्री दिला असून हा QVGA रेजोल्यूशन सोबत येतो. यात बॉटममध्ये नंबर आणि डी पॅड दिले आहे. हा फोन क्वॉलकॉम २०५ चिपसेट सोबत येतो. ज्यात ५१२ एमबीची रॅम दिली आहे. तसेच ४ जीबी स्टोरेज दिले आहे. हा एक ड्यूल सिम सपोर्ट करतो. याच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. हे YouTube, WhatsApp, आणि Facebook सह अन्य अॅप्सला सपोर्ट करते. वाचाः याशिवाय, युजर्स KaiStore वरून अॅप डाउनलोड करू शकतात. यात २ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. हे एलईडी फ्लॅश सोबत येते. सोबत 3.5mm हेडफओन जॅक, FM रेडिया आणि LED फ्लॅशलाइट दिले आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE दिले आहे. युजर्स या फोनवरून एचडी कॉल्स करू शकतात. या फोनमध्ये गुगल असिस्टेंटचे सपोर्ट दिले आहे. फोनला पॉवर म्हणून १५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SRISlf