Full Width(True/False)

'जीव वाचवणं हे इमेजपेक्षा जास्त महत्त्वाचं' मोदी सरकारवर टीका

मुंबई: करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरशः थैमान घातलं आहे. या व्हायरसपासून लोकांना वाचवण्यासाठी सरकारकडून होणारे प्रयत्न अयशस्वी ठरत आहे. दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची आणि सोबतच मृतांची संख्या वाढताना दिसत आहे. अशात बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता यांनी पंतप्रधान आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'सध्याच्या परिस्थिती आपली इमेज तयार करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे' असं म्हणत अनुपम खेर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे नेहमीच मोदी सरकारची स्तुती करणाऱ्या अनुपम खेरयांनी पहिल्यांदा मोदी सरकारवर टीका केली आहे. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले, 'सध्या देश करोनाच्या दुसऱ्या लाटेतून जात आहे. यामध्ये देशात जे काही घडत आहे त्यासाठी सरकारला जबाबदार ठरवणं गरजेचं आहे. सरकारनं हे समजून घेणं खूप गरजेच आहे की, सध्याच्या काळात स्वतःची इमेज तयार करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं सर्वाधिक गरजेचं आहे. सरकारच्या आरोग्य सेवा व्यवस्थापनात चूक झाली आहे. मात्र इतर राजकीय पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी या चुकांचा फायदा घेऊ नये.' या मुलाखतीत अनुपम खेर यांना, सरकार सध्या लोकांचा जीव वाचवण्यापेक्षा जास्त महत्त्व स्वतःच्या इमेजला देत आहे असं वाटतं का? त्यावर अनुपम खेर म्हणाले, 'सरकारनं सध्या स्वतःसमोर असलेल्या समस्यांचा सामना करायला हवा. हेच त्यांच्यासाठी गरजेचं आहे. ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे त्या लोकांसाठी काही करण्याची हीच वेळ आहे.' याशिवाय या मुलाखतीत अनुपम खेर यांनी गंगा आणि अन्य नद्यांमध्ये वाहून येत असलेल्या मृतदेहांच्या प्रकरणावरही भाष्य केलं. ते म्हणाले, काही प्रमाणात टीका करणं वैध आहे. एखाद्या निर्दयी व्यक्तीलाच गंगा नदीतील मृतदेह पाहून फरक पडणार नाही. सध्या देशात जे घडतंय त्याबद्दल राग येणं सहाजिक आहे आणि त्यासाठी सरकारला जबाबदार धरणं गरजेचं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3blpROm