नवी दिल्ली : महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत लाखो लोकं या व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. नुकतेच इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने () टेस्टसाठी नावाच्या सेल्फ टेस्टिंग किटला मंजूरी दिली आहे. या किटला पुण्यातील ने तयार केले आहे. वाचाः किंमतीबद्दल सांगायचे तर CoviSelf टेस्टिंग किटची किंमत २५० रुपये आहे. या किटच्या मदतीने जास्तीत जास्त लोकांचे टेस्टिंग करण्यास मदत होईल. यामुळे लोकं घरच्या घरी टेस्ट करू शकतील व लॅब रिपोर्टसाठी वाट पाहण्याची देखील आवश्यकता भासणार नाही. Mylab Discovery Solutions, पुणेचे डायरेक्टर सुजीत जैन म्हणाले की, सेल्फ टेस्टिंग किटद्वारे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास आरटी-पीसीआर टेस्टची आवश्यक नाही. याचा सहज वापर करता येईल. प्रत्येक किटसोबत एक मॅन्युअल दिले जाईल, ज्याच्या मदतीने हे किट वापरता येईल. सेल्फ टेस्टिंग किटबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी CoviSelf पहिले असे किट आहे, ज्याद्वारे स्वतः टेस्टिंग करणे शक्य आहे. टेस्ट पूर्ण होण्यासाठी २० मिनिटे लागतात. रिझल्टला अॅपवर पाहता येईल. यात एक यूनिक कोड जनरेट केला जाईल, ज्यामुळे योग्य रिपोर्ट मिळेल. सहज व सुरक्षित डिस्पोजलसाठी हे किट बायोहाजर्ड बॅगेत पॅक करण्यात आलेले आहे. हे किट व्यवस्थितरित्या खास डिझाइनसह करण्यात आलेल्या ट्यूबसोबत येईल, जे व्हायरस नष्ट करण्यासाठी विशेष उपायासह येईल. वाचाः CoviSelf चा वापर करण्यासाठी या टिप्स वापरा सर्वात प्रथम तुमच्या फोनमध्ये Mylab CoviSelf अॅपला डाउनलोड करा. या अॅपमध्ये तुम्हाला तुमची माहिती नमूद करावी लागेल. देण्यात आलेल्या माहितीसोबत कोडला लिंक करण्यासाठी टेस्टिंग डिव्हाइसवर देण्यात आलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करायचे आहे. त्याआधी तुमचा हात स्वच्छ धुवून घ्या. आता तुम्हाला फ्री-फिल्ड बफर ट्यूबवर व्हर्टिकली टॅप करावे लागेल. लक्षात ठेवा की एक्सट्रॅक्शन बफर सॉल्यूशन ट्यूबच्या खाली असेल. त्यानंतर त्याची कॅब काढा. आता नॉजट्रेल स्वॅब (नाकात टाकायची स्टिक) घ्यायचे आहे व जोपर्यंत तुम्हाला काही समस्या जाणवत नाही तोपर्यंत नाकात टाकायचे आहे. नाकाच्या आत ४-५ वेळा फिरवावे. आता दुसऱ्या नाकपुडीत देखील हिच प्रक्रिया पुन्हा करा. आता तुम्हाला या नेजल स्वॅबला भरलेल्या एक्सट्रॅक्शन ट्यूबमध्ये बुडवायचे आहे व खालून पिंच करावे. तुम्हाला स्वॅबला त्यात देण्यात आलेल्या ब्रेक प्वाइंटला तोडण्यासाठी १० वेळ फिरवावे लागेल. आता ट्यूबला त्यासोबत देण्यात आलेल्या नोजल कॅपने बंद करा. ट्यूब दाबून टेस्ट डिव्हाइसच्या सँपलमध्ये काढण्यात आलेल्या अँटीजन बफर मिक्सचरचे दोन ड्रॉप टाकायचे आहेत. यानंतर काही मिनिटे थांबा व १० ते १५ मिनिटात रिझल्ट उपलब्ध असेल. जर रिझल्ट २० मिनिटात न आल्यास रिपोर्ट नेगेटिव्ह असला पाहिजे. जर रिझल्ट २० मिनिटानंतर दिसल्यास तो इनवॅलिड असेल. यानंतर फोन अॅपमध्ये डिव्हाइसचा एक फोटो काढावा व टेस्टच्या विश्लेषणाची वाट पाहावी. या किटसोबत देण्यात आलेल्या बायोहाजर्ड बॅमध्ये किटची विल्हेवाट लावावी. जर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल तर आयसीएमआरच्या गाइडलाइन्सनुसार स्वतःला आयसोलेट करावे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hOlC23