मुंबई: सध्या संपूर्ण देश करोना व्हायरसशी लढताना दिसत आहे. या व्हायरसमुळे अनेक लोकांचा मृत्यू होताना दिसत आहे. पण बॉलिवूड अभिनेता मात्र अगदी सुरुवातीच्या काळापासूनच करोनाच्या कठीण काळात सातत्यानं सामान्य गरजू लोकांची मदत करताना दिसत आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर वेळोवेळी त्याचं कौतुक होताना दिसतं. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनूनं त्याच्या आई-वडिलांबद्दल एक हैराण करणारं विधान केलं आहे. 'बरं झालं माझे आई-बाबा योग्य वेळीच हे जग सोडून गेले' असं सोनूनं या मुलाखतीत म्हटल्यानं त्याचे चाहतेही हैराण झाले आहेत. एका हिंदी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदनं करोना व्हायरसच्या विषयावर चर्चा केली. त्यावेळी तो म्हणाला, 'मी कधीच हे बोललो नाही. पण मला वाटतं माझे आई-वडील आता या जगात नाहीत हे चांगलंच आहे. ते अगदी योग्य वेळीच हे जग सोडून गेलेत. जर ते आता असते आणि मी जर त्यांना रुग्णालयात एक बेड किंवा ऑक्सिजन उपलब्ध करुन देऊ शकलो नसतो. तर मला सर्वाधिक दुःख झालं असतं. मी रोज लोकांना रडताना आणि खचून जाताना पाहत आहे. या पेक्षा वाईट वेळ कधी आली नव्हती आणि कधी येणारही नाही.' सोनू सूदनं आपल्या परोपकारी स्वभावाचं सर्व श्रेय त्याच्या आई-वडिलांना दिलं आहे. सोनू सूदनं या मुलाखातीत सांगितलं की, पंजाबमध्ये असताना दुकानाच्या बाहेर त्याचे वडील लोकांना जेवण देत असत. गरीब लोकांची मदत करत असत. सानूची आई देखील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवत असे. करोना व्हायरसच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या काळात सोनू सूदनं अनेक गरजू लोकांना ऑक्सिजन, इंजेक्शन, हॉस्पिटल बेड, औषधं इत्यादी गोष्टी देण्यासाठी बरीच मदर केली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत त्यानं प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत केली होती. तसेच अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठीही मदत केली होती. त्यानंतर त्यानं आतापर्यंत त्याचं हे काम चालूच ठेवलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fdharD