मुंबई : आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. अनुष्का शर्माने कमी वयात खूप प्रसिद्धी मिळवली. विराट कोहलीसोबतचे तिचे नातेसंबंध आणि त्यानंतरदोघांचे लग्न यावरून दोघेही कायम चर्चेत असतात. या जानेवारी महिन्यात अनुष्काने मुलीला जन्म दिला. अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त या दोघांच्या नातेसंबंधांतील चर्चेत न आलेल्या पैलूंबद्ल जाणून घेऊ या.. त्यांची पहिली भेट अनुष्का आणि विराट एका जाहिरातीच्या चित्रीकरणावेळी पहिल्यांदा भेटले. ही जाहिरात झाल्यानंतर अनेकदा हे दोघे एकत्र दिसले. दोघांचे लव्ह अॅट फस्ट साइट असे काही नव्हते तर या दोघांनी खूप विचार करून एकमेकांची निवड केली. विराटला जेवणासाठी केले आमंत्रित विराट आणि अनुष्काने जी जाहिरात केली त्याचे चित्रीकरण तीन दिवस सुरू होते. सुरुवातीच्या काळात विराट हा अतिशय रागीट आणि घमेंडी व्यक्ती असल्याचा अनुष्काचा समज झाला होता. परंतु या दोघांच्या भेटी झाल्या तेव्हा विराट तिला अतिशय संवेदनशील, हुशार आणि त्याच्यात दडलेला विनोदी स्वभावाची ओळख झाली. जाहिरातीच्या चित्रीकरणाच्या दुसऱ्या दिवशी अनुष्काने आपल्या नवीन घरी सगळ्यांसाठी पार्टी ठेवली होती. त्या पार्टीला तिच्या मित्रमंडळींसोबत विराटलाही बोलावले होते. त्या जाहिरातीसाठी विराटने मानले आभार विराट कोहलीने देखील एका मुलाखतीमध्ये या जाहिरातीमध्ये निवड केल्याबद्दल आभार मानले आहेत. या जाहिरातीमुळे आम्ही दोघे एकमेकांना भेटलो. या जाहिरातीच्या चित्रीकरणावेळी आम्ही दोघांनी खूप धम्माल, मस्ती केली यातूनच आमचे सुर जुळले आणि आमचे नातेसंबंध अधिक दृढ झाले. यापेक्षा मोठ्या हिल्स मिळाल्या नाहीत का?या शॅम्पूच्या जाहिरातीवेळी विराट आणि अनुष्का पहिल्यांदा भेटले तेव्हा अनुष्का खूप उंच दिसत होती. चित्रीकरणासाठी दोघं एकमेकांसमोर आले तेव्हा विराटने तिला यापेक्षा मोठ्या हिल्स तुला मिळाल्या नाहीत का असा प्रश्न विचारला. विराटने अशा पद्धतीने विचारल्याने अनुष्काला विचित्र वाटले होते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून विराटने तो मस्करी करत असल्याचे सांगितले. अनेक वर्षे डेटिंगनंतर केले लग्नया जाहिरातीनंतर विराट आणि अनुष्काने एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. जवळपास पाच वर्षे डेट केल्यानंतर ११ डिसेंबर २०१७ ला विराट आणि अनुष्काने लग्न केले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील मोजके सदस्य आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xAtY2C