मुंबई- छोट्या पडद्यावरील कार्यक्रम '' च्या मंचावर प्रत्येक आठवड्याला एका नव्या कलाकाराला बोलवण्यात येतं. हे कलाकार स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढवत त्यांना अनेक सल्लेही देत असतात. येत्या आठवड्यात बॉलिवूडच्या लोकप्रिय गायिका 'इंडियन आयडल १२' च्या मंचावर येणार आहेत. अनुराधा यांनी त्यांच्या आवाजाने कित्येक दशकं बॉलिवूडवर राज्य केलं आहे. त्यांच्या आवाजाची मोहिनी आजही प्रेक्षकांवर पाहायला मिळते. चॅनेलतर्फे दाखवण्यात आलेल्या प्रोमोमध्ये अनुराधा त्यांचं अत्यंत गाजलेलं गाणं 'धक धक करने लगा' या गाण्यासंदर्भात काही आठवणी सांगणार आहेत. चॅनेलच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये अनुराधा त्यांच्या लोकप्रिय गाण्यात आऊच हा शब्द कसा आला याचा किस्सा सांगणार आहेत. व्हिडिओत गाण्याबद्दल बोलताना अनुराधा म्हणतात, 'जेव्हा 'धक धक करने लगा' या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं तेव्हा मला बाहेरगावी जाण्यासाठी विमान पकडायचं होतं. रेकॉर्डिंगमुळे मला आधीच उशीर होत होता. निर्मात्यांनी सांगितलं की उद्यापासून चित्रीकरण सुरू होतंय तर रेकॉर्डिंग पूर्ण करूनच जा. मला सांगितलं गेलं की, गाण्यात सुरुवातीलाच काहीतरी आकर्षक आणि सिडक्टिव्ह शब्द आला पाहिजे जसं अरे रे रे. मी म्हणाले की मी आऊच शब्द म्हणेन आणि मी स्वप्नातही विचार केला नव्हता की हा आऊच शब्द एक ट्रेडमार्क होईल.' या गाण्याचं संपूर्ण श्रेय अनुराधा यांनी माधुरी दीक्षितला दिलं. 'धक धक करने लगा' या गाण्यामुळेच माधुरी दीक्षितला खरी ओळख मिळाली होती. हे गाणं माधुरी आणि अनिल कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. 'बेटा' चित्रपटातील हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं होतं. गाण्यामुळे अनिल- माधुरीच्या जोडीची प्रचंड चर्चा रंगली होती. त्यानंतरच माधुरीला धक धक गर्ल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या गाण्यामुळे अनुराधा यांनाही प्रचंड नाव मिळालं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/340YTYk