Full Width(True/False)

Motorola ची लेटेस्ट स्मार्टवॉच भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः Motorola ने भारतात आपली लेटेस्ट स्मार्टवॉच ला लाँच केले आहे. मोटोरोची ही वॉच ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आली आहे. या स्मार्टवॉचचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात यूनिसेक्स डिझाइन दिली आहे. आउटडोर आणि फेटनेस अॅक्टिविटीजला ट्रॅक करते. ही स्मार्टवॉच वॉटर रेजिस्टेंट आहे. तसेच ती गुगलच्या Wear OS वर काम करते. वाचाः Moto 360 (3rd-generation)ची किंमत मोटोच्या या स्मार्टवॉचला भारतात १९ हजार ९९९ रुपयांत लाँच केले आहे. ही स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. या वॉचवर कंपनी दोन वर्षाची वॉरंटी देत आहे. कंपनीने या सेलच्या तारखेची अद्याप खुलासा केला नाही. वाचाः Moto 360 (3rd-generation)चे फीचर्स मोटोच्या या स्मार्टवॉच मध्ये १.२ इंच अमोलेड टचस्क्रीन आहे. याचा रिझॉल्यूशन 390x390 पिक्सल आहे. याच्या स्क्रीनच्या सुरक्षेसाठी गोरिला ग्लास ३ चे प्रोटेक्शन दिले आहे. या वॉच मध्ये एक स्क्रॅच रेजिस्टेंट सर्क्युलर डायल, एक स्टेनलेस स्टील केस आणि उजव्या बाजुला दोन बटन मिळतात. ही लेदर आणि रबर वॉच स्ट्रॅप्स सोबत येते. मोटो 360 3rd जनरेशन रोज गोल्ड आणि ब्लॅक कलर मध्ये येते. वॉच गुगलच्या Wear OS वर काम करते. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन Wear 3100 प्रोसेसर, 1GB रॅम आणि 8GB इनबिल्ट स्टोरेज सारखे फीचर्स दिले आहेत. या स्मार्टवॉच मध्ये २४ तासांची बॅटरी लाइफ मिळते. वाचाः मोटोरोलाची ही स्मार्टवॉच अँड्रॉयड आणि iOS अशा दोन्ही डिव्हाइससाठी उपलब्ध आहे. यात कनेक्टिविटीसाठी वाय फाय, ब्लूटूथ ४.२, जीपीएस आणि एनएफसी सारखे फीचर्स दिले आहेत. मोटोच्या या लेटेस्ट स्मार्टवॉच मध्ये अनेक फिटनेस आणि हेल्थ संबंधीत फीचर्स दिले आहेत. ही हार्ट रेट मॉनिटरिंग, डिस्टेंस आणि स्टेप काउंट सोबत कॅलरी काउंट करू शकते. याशिवाय, यात कॅलेंडरसाठी अलार्म सेट करणे, अलर्ट, थर्ड पार्ट अॅप्स, टेक्स्ट, सोशल मीडिया आणि ई-मेल सारखी सुविधा मिळते. मोटोच्या या व्हियरेबलमध्ये अॅक्सीलेरोमीटर, जायरोस्कोप, बॅरामीटर आणि अॅम्बिंयट लाइट सेन्सर सारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bJ8KGu