मुंबई : करोनाची औषधे मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. करोन झालेल्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यास डॉक्टर सांगत आहेत. परंतु याच इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच संदर्भात एका वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी सर्वसामान्यांचे मते जाणून घेत होता. त्यावेळी एका युवक तावातावाने याबाबत त्याचे मत मांडत होता. यावेळी त्याने एक मोठा विनोद केला .परंतु तिथे असलेल्या कुणालाच तो कळला नाही. हा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर गेला तेव्हा मात्र ता युवकाने केलेला विनोद सगळ्यांच्या लक्षात आला. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. काय झाला विनोद रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार होत असल्याबद्दल मत मांडताना तो तरुण चांगलाच संतापला होता. त्यामुळे याच संतापाच्या भरात त्याने रेमडेसिवीर इंजेक्शन ऐवजी रेमो डिसुझा असे नाव घेतले. तो बोलत असताना त्याच्या आजूबाजूचे सर्वजण गंभीरपणे ऐकत होते. इतकेच नाही तर वृत्तवाहिनीचा तो प्रतिनिधी देखील त्याचे मत नोंदवून घेत होता. परंतु त्याच्यादेखील ही गोष्ट लक्षात आली नाही. हा युवक रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्याच्या काळाबाजार या विषयी मत मांडत होता. ते मांडता मांडता तो म्हणाला, ' करोनावर उपचारासाठी सिप्ला कंपनीच्या 'रेमो डिसूझा' या इंजेक्शनची किंमत ५०० रुपये आहे आणि तुम्ही पाच हजार रुपये कसे घेता... हा काळाबाजार नाही तर काय आहे...' हा व्हिडीओ सोशल मीडियावर अल्पावधीत व्हायरल इतका झाला की तो व्हिडीओ थेट रेमो डिसूझापर्यंत पोहोचला. मग त्याने तातडीने हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले आहे की, या व्हिडीओचा शेवट अजिबात चुकवू नका... #justforlaugh असा हॅशटॅगही त्याने वापरला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tHc1fL