मुंबई- जेव्हा बापाची चप्पल मुलाच्या पायात व्यवस्थित बसते तेव्हा आपला मुलगा मोठा झाला असं प्रत्येक बापाला वाटतं. आपल्या मुलाकडून प्रत्येक बापाच्या अपेक्षा असतात. त्याच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी टाकून आपण मोकळं व्हावं असं बापाला वाटत असतं. पण हाच वयात आलेला तरणा ताठा मुलगा जर काळाने हिरावून नेला तर? याचं संकल्पनेवर आधारित आहे लोकप्रिय लेखिका, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचा '' चित्रपट. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्जनशील लेखिका आणि दिग्दर्शिका अशी ओळख असणाऱ्या सुमित्रा भावे यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. त्याच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीने एक विचारवंत आणि सामाजिक भान जपणारी दिग्दर्शिका गमावली. त्यांच्याच विचारातून बनलेल्या 'दिठी' ने सहा आंतरराष्ट्रीय, ११ राष्ट्रीय आणि ४५ पेक्षा जास्त राज्य पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. देश- विदेशांमध्ये गौरवण्यात आलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुमित्रा भावे यांनी 'दिठी' चं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट खेड्यातील एका लोहारकाम करणाऱ्या सामान्य व्यक्तीची जीवन कथा आहे. ज्याचा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून जातो. आपला तरुण मुलगा गमावल्यावर त्या म्हाताऱ्या बापाच्या जीवाची होणारी घालमेल, त्याच्या वेदना या चित्रपटात चित्रीत करण्यात आल्या आहेत. हा चित्रपट २१ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिववर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, , , , अंजली पाटील, , कैलाश वाघमारे, उत्तरा बावकर आणि ओमकार गोवर्धन यांसारख्या प्रतिभावंत कलाकारांच्या भूमिका आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33FQPMs