Full Width(True/False)

गुड न्यूज! गायिका सावनी रवींद्र होणार आई, सोशल मीडियावरून दिली गोड बातमी

मुंबई: राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सुमधूर गळ्याची गायिका ‘’ने नुकतीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे फोटो शेअर करत. ती लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली. तिच्या घरी नवीन सदस्य लवकरच येणार आहे. नुकताच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि आता ही गोड बातमी त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. सावनीनं तिच्या इन्स्टाग्रामवर नवऱ्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती हिरव्या रंगाच्या साडीमध्ये खूपच गोड दिसत आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना सावनीनं त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तू + मी = तीन' सावनीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. सोबतच तिचे चाहते तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिचं अभिनंदन करताना दिसत आहेत. सावनी या गोड बातमी विषयी भावना व्यक्त करताना सांगते, 'माझ्या मनात सध्या खूप अलौकीक भावना आहेत. ज्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आजवर मी गायिका म्हणून आईपणावर वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत. अंगाईगीत, डोहाळे जेवणाचे गीत, बारश्याची गाणी मी या आधी गायली होती. पण आता मी स्वत: त्या भूमिकेत जाणार आहे. त्यामुळे आईपण अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला अस वाटतं की प्रत्येक स्त्री ही भाग्यवान असते. कारण ती आई होऊ शकते. आईपण काय असतं हे फक्त एक आईच जाणू शकते आणि सध्या मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर आहे आणि या फेजचा मी पुरेपुरं आनंद घेत आहे.' पुढे ती सांगते, 'माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म आहे. कारण माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच गेल्या सहा महिन्यात मी गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझीक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केलेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली. काही गाणी लवकरच रिलीज होतील. मला खूप अभिमान आहे की माझ्या होणाऱ्या बाळाने मला त्या परिस्थितीत अजिबात त्रास दिलेला नाही. आता मी माझ्या बाळाच्या स्वागतासाठी फारचं उत्सुक आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wGfaOI