Full Width(True/False)

राम गोपाल वर्मा यांनी शेअर केले 'सत्या' च्या सेटवरील फोटो, उर्मिलाला म्हणाले...

मुंबई- यांचं नाव आजही प्रयोगशील दिग्दर्शकांच्या यादीत घेतलं जातं. राम यांनी आजपर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपट बनवले आहेत. राम यांच्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग प्रचंड मोठा आहे. आज भलेही राम अनेक वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतील. परंतु, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांची मोहिनी आजही प्रेक्षकांवर पाहायला मिळते. त्यातील एक चित्रपट म्हणजे ''. राम यांनी 'सत्या' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यात अभिनेत्री प्रेक्षकांचं प्रेम पाहून भारावून गेलेली दिसतेय. राम यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यातील पहिल्या फोटोत उर्मिला एका इमारतीमध्ये उभी राहून लाजताना दिसतेय तर खाली तिच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली आहे. या फोटोला कॅप्शन देत राम यांनी उर्मिलाची मस्करी करत लिहिलं, 'चित्रपट 'रंगीला' च्या यशानंतर आपल्याच लोकप्रियतेला सांभाळू न शकलेली उर्मिला मातोंडकर. हा फोटो 'सत्या' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळचा आहे.' यासोबतच राम यांनी आणखी एक फोटो शेअर करत लिहिलं, 'लेखक अनुराग कश्यप आणि सौरभ शुक्ला उर्मिलाला सीन समजावून सांगत आहेत. तर दुसरीकडे कॅमेरामॅन जेराल्ड हूपर हा सीन कसा चित्रित करायचा यासाठी कॅमेरा लावत आहेत.' याशिवाय 'सत्या' चित्रपटातील इतरांची ओळख करून देणारा एक फोटो शेअर करत राम यांनी लिहिलं, 'डाव्या बाजूला माझी सुंदर सहाय्यक दिग्दर्शक आदिती आहे मध्ये निर्माते शेखर ज्यांचं पाच दिवसांपूर्वी करोनामुळे निधन झालं आणि उजव्या बाजूला चिन्ना आहेत जे माझं प्रोडक्शन सांभाळायचे.' राम यांच्या 'सत्या' चित्रपटामध्ये मनोज बाजपेयी, उर्मिला मातोंडकर, सौरभ शुक्ला, शेफाली शाह, परेश रावल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने मनोज बाजपेयीला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यासोबतच सौरभ शुक्लादेखील कल्लू मामा या नावाने प्रसिद्ध झाले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yOTXUz