Full Width(True/False)

मोबाइल कंपनी नव्हे तर स्मार्टफोन खरेदी करण्याआधी 'हे' ७ फीचर्स पाहा

नवी दिल्ली : नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. स्मार्टफोन खरेदी करण्याआधी त्याच्या ब्रँडच्या ऐवजी स्पेसिफिकेशनबद्दल अधिक माहिती करून घेतली पाहिजे. काही फीचर्स स्मार्टफोन्सला इतर फोनच्या तुलनेत अधिक दमदार बनवतात. स्मार्टफोन्स खरेदी करण्याआधी कोणत्या फीचर्सकडे अधिक लक्ष द्यायला हवे, ते जाणून घ्यावे. वाचा : डिस्प्ले अनेकदा लोकांचा स्क्रीनबाबत गोंधळ उडतो. एलसीडी चांगला आहे की सॅमसंगचा एमोलेड याबाबत लोकांच्या मनात प्रश्न असतो. एलसीडीमध्ये ब्राइटनेस अधिक असते. तर एमोलेड पॅनेल बॅटरीची बचत करते. सोबतच, यात रंग देखील अधिक चांगले दिसतात. अशात एलसीडी आणि एमोलेडमध्ये निवड करायची झाल्यास, तुम्ही एमोलेडची निवड करू शकता. रिफ्रेश रेट स्मार्टफोन खरेदी करताना डिस्प्लेच्या रिफ्रेश रेटबद्दल जाणून घेतले पाहिजे. फोनमध्ये ६०Hz, ९०Hz, १२०Hz, १४४Hz पासून ते ४८०Hz पर्यंत रिफ्रेश रेट मिळतो. यामुळे तुमचा फोन किती सहज चालेल हे ठरते. रिफ्रेश रेटमुळे गेमिंग सोपे होते. सोबतच फोनच्या रिझॉल्यूशनकडे देखील लक्ष द्यावे. ६ इंच स्क्रीन असलेल्या स्मार्टफोनसाठी एचडी रिझॉल्यूशन चांगले मानले जात नाही. या साइजमध्ये Full HD मध्ये रिझॉल्यूशन अधिक उत्तम असते. वाचा : नेहमी लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम असणारा फोन खरेदी करावा. बाजारात सर्वसाधारपणे आणि आयओएस ऑपरेटिंग स्मार्टफोन आहेत. अँड्राइड गुगलचे आहे, ज्याचे लेटेस्ट व्हर्जन अँड्राइड ११ आहे. तर iOS हे चे आहे. जे अँड्राइडच्या तुलनेत डिव्हाइसला अधिक सुरक्षा प्रदान करते. प्रोसेसर फोनसाठी सर्वात महत्त्वाचा प्रोसेसर असतो. फोन खरेदी करताना प्रोसेसरकडे अधिक लक्ष द्यावे. फोनमध्ये , , , Exynos सारख्या कंपन्यांचे प्रोसेसर मिळतात. मात्र, प्रोसेसरच्या नावाऐवजी चिप साइजवर लक्ष द्यावे. चिप साइज जेवढी कमी असेल, परफॉर्मेंस तेवढा अधिक चांगला होतो. चिप साइजला नॅनो मीटरमध्ये मोजले जाते. हे १२nm, ८nm, ७nm, ५nm सारख्या साइजमध्ये येते. तुम्ही १२nm च्या ऐवजी ८nm किंवा ७nm चीपसेट असलेल्या फोनला कधीही प्राधान्य द्यावे. तुम्ही महागडा फोन खरेदी करत असाल तर ५nm चिपसेट असलेला स्मार्टफोन खरेदी करावा. Apple ची लेटेस्ट Apple A14 Bionic चिप ५nm मध्ये येते. वाचा : रॅम आणि स्टोरेज ज्याप्रमाणे फोनचा वापर वाढत चालला आहे, त्यामुळे अधिक स्टोरेजची गरज भासते. सोबतच अ‍ॅप रन होण्यासाठी जास्त इंटर्नल स्टोरेजची गरज असते. तुम्ही स्मार्टफोन खरेदी करत असाल तर कमीत कमी ६४ जीबी स्टोरेज असावे. मिड रेंज स्मार्टफोनसाठी १२८ जीबी आणि फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी २५६ जीबी स्टोरेज असणे गरजेचे आहे. जर तुम्ही फोनमध्ये गेम खेळत असाल तर अ‍ॅपचा जास्त वापर होतो, अशात जास्त रॅम असणारा स्मार्टफोन घ्यावा. बजेट स्मार्टफोनसाठी ४ जीबी ते ६ जीबी रॅम उत्तम मानली जाती. महागड्या फोनमध्ये १२ जीबी रॅम देखील मिळते. कॅमेरा फोनच्या कॅमेऱ्याची निवड जास्त मेगापिक्सल आणि जास्त लेंसच्या आधारावर करू नये. असे असते तर कमी मेगापिक्सल असलेल्या iPhone मध्ये उत्तम फोटो कसे येतात. चांगल्या कॅमेऱ्याची गॅरेंटी सेंसर साइज, अपर्चर, शटर स्पीड आणि फोनच्या प्रोसेसरवर अवलंबून असते. त्यामुळे फोन घेताना कॅमेऱ्याशी संबंधित या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. बॅटरी फोनचा जास्त वापर करत असाल तर मोठी बॅटरी असणे गरजेचे आहे. फोन खरेदी करताना ४००० एमएएच पेक्षा अधिक बॅटरी असेल, याकडे लक्ष द्या. फोनमध्ये जास्त रिफ्रेश रेड, ब्राइटनेस आणि जास्त रिझॉल्यूशनमुळे अधिक बॅटरी समाप्त होते. त्यामुळे नेहमी फास्ट चार्जर असणारे स्मार्टफोन खरेदी करावे. सध्या १८ वॉट ते ६५ वॉटचे चार्जर येत आहे. जे काही मिनिटातच स्मार्टफोनला फूल चार्ज करतात. अशात ग्राहकांनी आपल्या गरजेनुसार याची निवड करावी. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wuw7LT