Full Width(True/False)

'पैशांसाठी पगडी बांधत नाही' IPL खेळाडूचा अक्षय कुमारला टोला

मुंबई: काही महिन्यांपूर्वी देशात सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटले होते. अगदी जागतिक स्तरावर याची दखल घेण्यात आली होती. पण या आंदोलनाबाबत बॉलिवूडकरांच्या भूमिकेवरून बरेच वाद झाले. अशात आता आयपीएल टीम किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू यानं अभिनेता अक्षय कुमारवर निशाणा साधत त्याच्यावर टीका केली आहे. एका चाहत्यानं हरप्रीतची तुलना अक्षयशी केल्यानंतर त्यानं आपण पैशांसाठी पगडी घालत नसल्याचं म्हणत अक्षय कुमारला टोला लगावला आहे. हरप्रीतने च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसोबतच्या सामन्यात तुफान फलंदाजी आणि गोलंदाजी केली. यानंतर तो आयपीएलचा स्टार खेळाडू झालाय. अशा वेळी एका चाहत्यानं इन्स्टाग्रामवर त्याला मेसेज करत 'तू सिंग इज ब्लिंगमधल्या अक्षय कुमारसारखा दिसतोस असं म्हटलं होतं.' यावर हरप्रीतनं त्याच्या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये 'मी पैशांसाठी पगडी घालत नाही' असं म्हटलं आहे. यासोबतच त्या #ISupportFarmers असा हॅशटॅगही वापरला आहे. अर्थात याचा थेट रोख अक्षय कुमारच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या भूमिकेविषयी आहे हे स्पष्ट आहे. क्रिकेटर हरप्रीत ब्रार पगडी घालण्याबाबत अभिमान बाळगत असल्याचं त्याच्या सोशल मीडियावरून दिसून येतं. पंजाबमधील मोगा भागातील २५ वर्षीय हरप्रीत ब्रारनं आपल्या अष्टपैलू खेळाने पंजाबला विजय मिळवून दिलाय. त्यानंतर त्याचा आयपीएलच्या स्टार खेळाडूंच्या यादीत समावेश झालाय. हरप्रीतचे ट्विटर अकाऊंट पाहिले तर लक्षात येतं की हरप्रीत शेतकरी प्रश्नांवर नेहमीच जाहीर भूमिका घेत आला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनातही त्याचा सहभाग घेतला होता. दरम्यान अक्षय कुमारनं मात्र शेतकरी आंदोलनाबाबत सरकराच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानानं याबाबत ट्वीट केल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी सरकारच्या भूमिकेला पाठींबा देत ट्वीट केले होते. ज्यावर पंजाबच्या अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती आणि आता हरप्रीत ब्रारनंही त्यावरूनच अक्षय कुमारवर निशाना साधल्याचं लक्षात येतं. हरप्रीत ब्रारचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xJTlPJ