म.टा. प्रतिनिधी, नागपूर प्रोफाइलमध्ये सुंदर छायाचित्र असलेल्या तरुणीने तुम्हाला पाठविली किंवा फॉलो केले तर बळी पडू नका. हीच तरुणी आपल्याला केव्हा बळीचा बकरा बनवेल याचा नेम नाही. निर्वस्त्र असलेले चित्रीकरण करून ही टोळी नागरिकांडून खंडणी उकळत आहे. या टोळीने आतापर्यंत उपराजधानीतील साठहून अधिक नेटकऱ्यांकडून खंडणी उकळली आहे. पोलिसांकडे याबाबतच्या नोंदी आहेत. वाचाः अनेकांना अजूनही खंडणीची मागणी केली जात आहे. मात्र, कुणी इभ्रतीपोटी तक्रारीसाठी पुढे येतातच, असेही नाही. त्यामुळे ‘सावध व्हा. बुलाती है, मगर जाने का नही, असा ठाम निश्चय करा. अन्यथा पैसा तर जाईलच, सोबत सामाजिक पतही गमावून बसाल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वाचाः रिया किंवा अन्य आकर्षक नावाने ही टोळी सावजाला हेरते. त्यांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविते. सोशल मीडियावर फॉलो करते. सुरुवातीला चॅट करून ती नेटकऱ्याचा मोबाइल क्रमांक घेते. या टोळीचा रात्रीस खेळ चालतो. समोरच्याचा विश्वास संपादन केला जातो. त्याला रिझविले जाते. रात्री व्हिडीओ कॉल करून या तरुणी अश्लील चॅट करतात. समोरची व्यक्ती घट्ट जाळ्यात अडकल्याची खात्री पटताच ती तुम्हाला ऑनलाइन निर्वस्त्र करते. त्याचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देते अन् लाखो रुपयांची खंडणी उकळली जाते. गेल्या काही महिन्यांत नागपुरात अशाप्रकारे खंडणी उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. सायबर पोलिस स्टेशनमध्ये आतापर्यंत ६० जणांनी अशाप्रकारे खंडणी उकळण्यात आल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी ती नोंदवून घेतली. आठवड्यातून तीन ते चार जण पोलिसांकडे अशाप्रकारे फसगत झाल्याची माहिती देत आहेत. वाचाः डॉक्टर, पोलिस, सीए, ज्येष्ठही... या टोळीच्या जाळ्यात आतापर्यंत डॉक्टर, पोलिस, अभियंते, सीए, विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकही अडकल्याचे समोर आले आहे. या टोळीने एका सीएकडून तब्बल सव्वातीन लाख रुपये उकळल्याचीही माहिती आहे. मात्र, बदनामीच्या भीतीने या सीएने गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. तसेच मध्यंतरी ६५वर्षीय ज्येष्ठही यात अडकला होता. पैसे लुटले गेल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दिली होती. वाचाः सतर्कताच महत्त्वाची! गेल्या तीन महिन्यांत ६०पेक्षा अधिक लोकांना या टोळीने जाळ्यात अडकविले आहे. हा आकडा अधिकही असू शकतो. बदनामीच्या भीतीने अनेकांनी गुन्हा दाखल करण्यास दिला आहे. निर्वस्त्र असलेले चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देऊन ही टोळी खंडणी उकळते. सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अनोळखी तरुणींची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारू नये. फसवणूक झालेल्या नागरिकांनी सायबर सेलकडे तक्रार करावी. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अशोक बागुल यांनी केले. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RVrrQs