Full Width(True/False)

वयाच्या ७४ व्या वर्षी रणधीर कपूर यांनी केली करोनावर मात

मुंबई : अभिनेता करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. घरी गेल्यानंतरही पुढचे दोन आठवडे काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे. दरम्यान, ७४ वर्षीय रणधीर कपूर यांना २९ एप्रिल रोजी करोनाची लागण झाली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रणधीर कपूर घरी आले. त्यांच्याशी ई-टाइम्सच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता ते म्हणाले, 'करोनामुक्त होऊन मी आता घरी आलो आहे. मला बरे वाटत आहे. परंतु मला पुढचे काही दिवस सर्वांपासून लांब राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे बबीता, करिश्मा कपूर करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांना मला भेटता येणार नाही. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर या सर्वांनी मी भेटणार आहे.' रणधीर कपूर यांनी कोकिलाबेन हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्स आणि संपूर्ण स्टाफचे आभार मानले आहेत. दरम्यान , रणधीर कपूर यांना ताप आल्यानंतर त्यांच्या मुलींनी त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांची करोना टेस्ट केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून रणधीर कपूर यांची काळजी घेण्याऱ्या त्यांच्या स्टाफला देखील हॉस्पिटमध्ये दाखल केले होते. रणधीर यांना एक दिवस आयसीयूमध्ये ठेवले होते. त्यानंतर त्यांना श्वास घेता येऊ लागल्याने त्यांना आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tQwoan