Full Width(True/False)

स्वस्तात मस्त! १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन्स

नवी दिल्ली : भारतात स्मार्टफोन्स वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या कमी किंमतीत दमदार फीचर्स देणारे फोन बाजारात आणत आहे. , , , , विवो, ओप्पोसह अनेक स्मार्टफोन कंपनीनी कमी किंमतीत शानदार फोन लाँच केले आहेत. १० हजार रुपये कमी किंमतीत पॉवरफूल बॅटरी, मोठा डिस्प्ले, जबरदस्त प्रोसेसर आणि कॅमेरा असणारे फोन बाजारात उपलब्ध आहेत. बाजारात १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम स्मार्टफोनविषयी जाणून घेऊया. वाचाः शाओमीच्या रेडमी ब्रँडच्या सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन Xiaomi Redmi 9 Power ची किंमत ९,९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.५३ इंचचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 662 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर असणारा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनमध्ये ६००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. बजेट रेंजमध्ये हा सॅमसंगचा सर्वोत्तम फोन मानला जातो. याची किंमत ९,९९९ रुपये असून, यात ६.५ इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो, ज्याचे ९० हार्ट्ज रिफ्रेश रेट आहे. अँड्राइड ११ ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या या फोनमध्ये Samsung Exynos 8nm ऑक्टा कोर प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह ६००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेंसरसह क्वॉड रियर कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Realme Narzo 20 या स्मार्टफोनची किंमत ९,९९९ रुपये आहे. याच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यात ६.५ इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा ६० हार्ट्ज रिफ्रेश रेट आहे. अँड्राइड १० ऑपरेटिंग सिस्टमसह येणाऱ्या या फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर मिळेल. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह येणाऱ्या या फोनमध्ये ६००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ४८ मेगापिक्सलच्या प्रायमरी सेंसर असणारा ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. वाचाः गेल्या २ वर्षात भारतीय बाजारात लोकप्रिय ठरलेल्या पोकोच्या या स्मार्टफोनची किंमत अ‍ॅमेझॉनवर काही अटींसह ८,३१९ रुपये आहे. यात ६.५३ इंच डिस्प्ले मिळतो, ज्याचे रिफ्रेश रेट 60 हार्ट्ज आहे. अँड्राइड १० ओएससोबत येणाऱ्या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 662 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. फोनला फ्रंटला ८ मेगापिक्सल आणि ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर असणारा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६०००एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. Vivo U10 १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील हा देखील सर्वोत्तम स्मार्टफोन आहे. Vivo U10 या फोनची किंमत ९,९९० रुपये आहे. यात ६.३५ इंच डिस्प्लेसह ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळते. फोन अँड्राइड ९ ओएसवर चालतो. यात Qualcomm Snapdragon 665 प्रोसेसर प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच, फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी देखील यात मिळते. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि १३ मेगापिक्सल प्रायमरी सेंसरसह ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. वाचाः OPPO A31 ओप्पोच्या स्मार्टफोनची किंमत ९,९९० रुपये आहे. यात ४ जीबी रॅम + जीबी स्टोरेजसह येणाऱ्या या फोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर मिळतो. अँड्राइड १० सपोर्टसह येणाऱ्या फोनमध्ये ६.५ इंच IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सल आणि १२ मेगापिक्सल प्रायमरी सेंसरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये ४२३० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. Nokia 2.4 १० हजारांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या नोकियाच्या या स्मार्टफोनची देखील मोठ्या प्रमाणात विक्री होते. या फोनची किंमत ९,९९९ रुपये आहे. नोकियाच्या या फोनमध्ये ६.५ इंचचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ३ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेजसह MediaTek Helio P22 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन अँड्राइड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनमध्ये पॉवरसाठी ४५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. यात फ्रंटला ५ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तर ड्युअल रियर कॅमेऱ्यासोबत येणाऱ्या या फोनमध्ये १३ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा मिळेल. Motorola Moto G10 Power मोटोरोलाने १० हजार रुपये कमी किंमतीत भारतात अनेक स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यात Motorola Moto G10 Power ची सर्वाधिक विक्री होते. ६.५ इंच IPS LCD डिस्प्ले असणाऱ्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 460 प्रोसेसर मिळेल. अँड्राइड ११ वर चालणाऱ्या या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. मोटोरोला मोटो जी १० पॉवर स्मार्टफोनमध्ये ६००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय फोनमध्ये ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्यासह क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचे प्रायमरी सेंसर ४८ मेगापिक्सल आहे. वाचाः वाचाः वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bwfcAp