Full Width(True/False)

'हे म्हणजे उपाशी लोकांसमोर बसून जेवल्यासारखं' सेलिब्रेटींच्या व्हेकेशनवर संतापले अन्नू कपूर

मुंबई: देशात करोना व्हायरसनं अक्षरशः थैमान घातलं आहे. अनेकांचा या व्हायरसमुळे मृत्यी झाला आहे. तर अनेकजण बेरोजगार झाले आहेत. ज्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ देखील आली आहे. देशभरात अशी बिकट परिस्थिती असताना काही बॉलिवूड सेलिब्रेटी मात्र त्याच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. सेलिब्रेटींच्या या वागण्यावर अभिनेता भडकले असून त्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. एका हिंदी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अन्नू कपूर म्हणाले, 'तुम्ही सुट्टी घ्या, व्हेकेशन एन्जॉय करा. यामुळे मला काहीच समस्या नाही. पण संपूर्ण देश करोना सारख्या व्हायरसशी लढत असताना किंवा दिवसाला हजारो लोक मरत असताना सेलिब्रेटींचं अशाप्रकारे सोशल मीडियावर व्हेकेशनचे फोटो शेअर करणं मला अजिबात आवडलेलं नाही. असं करणं म्हणजे एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीच्या समोर बसून पक्वान्नांनी भरलेली थाळी खाल्यासारखं आहे. माहीत आहे, तुमच्याकडे पैसा आहे. तुमच्यासाठी या गोष्टी परवडण्यासारख्या आहेत. पण अशा परिस्थिती हे असं वागणं शोभा देत नाही. प्रसिद्ध सेलिब्रेटींनी संवेदनशील असायला हवं आणि लोकांना सहानुभूती दाखवायला हवी.' अन्नू कपूर यांनी या आधीही मागच्या महिन्यात यासंदर्भात एक ट्वीट केलं होतं. ज्यात त्यांनी सेलिब्रेटींच्या व्हेकेशन ट्रीपवर टीका केली होती. त्यांनी लिहिलं होतं, 'श्रीमंत, सेलिब्रेटी आणि मीडिया यांना मी आवाहन करतो की, परदेशात जाऊन व्हेकेशन एन्जॉय करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका. कारण जगातील सर्वाधिक लोक या भयंकर रोगाचा सामना करत आहेत.' अन्नू कपूर यांच्या व्यतिरिक्त लेखिका शोभा डे आणि अभिनेत्री श्रुति हसननेही करोना काळात सेलिब्रेटींच्या व्हेकेशन एन्जॉय करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. देशात दर दिवशी करोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असताना सेलिब्रेटींचं अशाप्रकारे व्हेकेशन एन्जॉय करणं किंवा त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणं योग्य नसल्याचं त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vdHYO1