Full Width(True/False)

जिओ फोन युजर्ससाठी नवीन अपडेट, जुना फोन होणार एकदम नवीन

नवी दिल्लीः Jio फोन यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही सुद्धा कमी किंमतीत नवीन अपडेटचा फायदा घेऊ शकतात. यूजर्स खूप आधी पासून कमजोरी यूआय आणि परफॉर्मन्सवरून तक्रार करीत होते. परंतु, आता ही बातमी समोर येत आहे की, व्हर्जन नंबर ०२५८ वरून जिओ फोन मध्ये 36.39 MB चे अपडेट होत आहे. यामुळे या फीचर फोनचा परफॉर्मन्स खूप चांगला होईल. वाचाः टिप्स्टर अभिषेक यादव ने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट वरून ही माहिती शेयर केली आहे. ज्यात सांगितले की, जिओ फोन युजर्संसाठी एक नवीन अपडेट येणार आहे. या पोस्टमध्ये दोन स्क्रीनशॉट्स सुद्धा शेयर केला आहे. ज्यात सांगितले की, नवीन व्हर्जन जिओ फोनच्या सॉफ्टवेयरला अपडेट करण्यासोबतच परफॉर्मन्स जबरदस्त होणार आहे. अपडेट नंतर युजर्सचा डेटा सुद्धा नष्ट होणार नाही. नवीन अपडेटला साइज 36.39 MB असणार आहे. जे फीचर फोनमध्ये युजर्सला जबरदस्त परफॉर्मन्स अनुभव देईल. दरम्यान, आतापर्यंत कंपनीकडून यासंबंधी अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. वाचाः कमी किंमतीत जास्त फीचर्स Reliance Jio ने फ्री इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा देत असलेला जिओ फोन लाँच करून मार्केटमध्ये धुमाकूळ घातला होता. लोकांनी जिओ फोनला तुफान प्रतिसाद दिला होता. याप्रमाणे ४जी सिम प्रमाणे फीचर फोन मार्केट मध्ये जिओ फोनची चर्चा सुरू झाली होती. आता यात ५ वर्षानंतर नवीन अपडेट टाकले जाईल. त्यात लेटेस्ट बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिओ फोनची किंमत सध्या १ हजार ७९९ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bU7i41