Full Width(True/False)

'रुके ना तू झुके ना तू', बिग बींचा करोना योद्ध्यांना सलाम

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन लढ्यासाठी कोणताही गाजावाजा न करत मदत करत आहेत. इतकेच नाही तर या करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये फ्रंटलाइन कर्मचारी, करोना योद्ध्यांची हिंमत कायम रहावी यासाठी ते त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेत. अलिकडेच या सर्व करोना योद्ध्यांसाठी खास एक व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडील आणि कवी यांची एक कविता वाचून दाखवली आहे. अमिताभ बच्चन यांनी ज्या उत्साहात, ही कविता करोना योद्ध्यांसाठी सादर केली ती पाहून त्यांचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे. देशावर करोनाचे संकट आले आहे, त्याला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन बच्चन यांनी केले आहे. काय म्हणता आहेत बिग बी? या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांनी 'रुके ना तू, धनुष उठा प्रहार कर, तू सबसे पहला वार कर, अग्नि सी धधक-धधक, हिरण सी सजग-सजग, सिंग सी धहाड़ कर, शंख सी पुकार कर, रुके ना तू थके ना तू, झुके न तू ' कविता सादर केल्यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले, 'कवितेचे हे शब्द माझे वडील हरिवंशराय बच्चन यांचे असून हे शब्द सर्वांचे मनोबल वाढवणारे आहेत. देशापुढे अनेक संकटे आली होती त्या काळात त्यांनी ही कविता लिहिली होती. आज देशात जी परिस्थिती आहे त्याला ही कविता अगदी तंतोतंत लागू पडते आहे. ही कविता आज करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक करोना योद्ध्यांसाठी, फ्रण्टलाइन कर्मचाऱ्यांसाठी आहे. ही कविता या सर्वांचा उत्साह, मनोबल वाढवणारी आहे. हे सर्वजण आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. आता त्यांचे मनोबल कायम राहण्याची गरज आहे. ही आपल्या सर्वांची देखील लढाई आहे. त्यासाठी आपण जेवढे करू शकतो ते सर्वकाही करायचे आहे. भारताच्या सुरक्षेसाठी आपल्या सर्वांना एकत्र यायचे आहे.' आपण एकत्र येऊ तेव्हाच जिंकू अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करताना लिहिले आहे, 'आपण लढणार, सर्वजण एकत्र येऊन लढणार आणि जिंकणार आहोत.' अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी एका सेमिनारमध्ये सहभागी झाले होते. या सेमिनारला जगभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, नेते मंडळी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, पोप फ्रान्सिस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी भारतात करोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याची माहिती दिली. तसेच देशामध्ये करोना व्हॅक्सिनची मोहिमेबद्दल माहिती दिली होती. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कामासंदर्भात सांगायचे तर 'चेहरे' हा सिनेमा प्रदर्शनासाठी तयार आहे. परंतु करोना परिस्थितीमुळे त्याचे प्रदर्शन लांबले आहे. यासह त्यांचे अनेक सिनेमे त्यांच्याकडे आहेत. छोट्या पडद्यावरही कौन बनेगा करोडपती १३ या कार्यक्रमातून अमिताभ बच्चन लवकरच दिसणार आहेत. सध्या या कार्यक्रमाच्या प्रमोशनमध्ये ते व्यग्र आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Qa8g4z