नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी आपली नवीन किंवा वर काम करीत आहे. ही कंपनीचे ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) ईयरबड्स आहे. याचा एक टीजर सुद्धा लाँच करण्यात आला होता. यानुसार, हे अॅक्टिव नॉयस रिडक्शन सोबत आणले जाणार आहे. यासाठी शाओमीने एक पोस्टर जारी केले आहे. ज्यात नवीन प्रोडक्टची लाँचिंग तारीख सांगितली आहे. सोबत प्रोडक्टचे नाव सुद्धा सांगितले आहे. याचे नाव Mi FlipBuds Pro आहे. याला १३ मे रोजी लाँच केले जाणार आहे. भारतात हे कधीपर्यंत लाँच केले जाणार यासंंबंधी कंपनीने अद्याप कोणतीच माहिती दिली नाही. वाचाः Xiaomi ने Weibo वर आपल्या Smart Life अकाउंट द्वारे ही माहिती दिली आहे. या टीजर मध्ये एक इमेज दिली आहे. ज्यात Mi FlipBuds Pro चे चार्जिंग केस दिले आहे. याच्या वर एक लाइटचे इंडिकेटर आहे. सध्या हे चीनी मार्केट मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. याला चीनच्या बाहेर कधीपर्यंत लाँच केले जाणार हे सांगितले नाही. Mi FlipBuds Pro ला स्टेम-शेप्ड डिजाइन सोबत आणले जाणार आहे. सोबत यात 40dB चे अॅक्टिव नॉयस रिडक्शन फीचर सुद्धा दिले जाणार आहे. वाचाः या ईयरबड्सची इमेज शेयर करण्यात आली आहे. इमेज नुसार, हे ब्लॅक फिनिश सोबत येईल. यावर शाओमीचा लोगो सुद्धा बनवण्यात आला आहे. ही माहिती Mi FlipBuds Pro च्या टीजर्सद्वारे मिळाली आहे. Xiaomi ने नुकतेच Redmi AirDots 3 TWS ईयरबड्स लाँच केले होते. जे ७ तासांपर्यंत बॅटरी आणिaptX एडेप्टिव सपोर्ट सोबत आले होते. जर Mi ब्रँडेड TWS ईयरबड्समध्ये हे स्टेल डिझाइन सोबत येते. तर Redmi ब्रँडचे ईयरबड्स कॉम्पॅक्ट डिजाइन सोबत येते. चीनी कंपनी भारतात Redmi Earbuds S आणि Redmi Earbuds 2C सुद्धा उपलब्ध करते. सोबत Mi True Wireless Earphones 2C आणि Mi True Wireless Earphones 2 सुद्धा कंपनीच्या पोर्टफोलियाचा भाग आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2R5YFwm