Full Width(True/False)

भारतात लवकरच लाँच होणार सॅमसंगचे हे ६ सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन ,जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्ली. नामांकित टेक कंपनी सॅमसंग दरवर्षी अनेक स्मार्टफोन लॉन्च करत असते. भारतात शाओमीनंतर सर्वात मोठी स्मार्टफोन विक्री करणारी कंपनी सॅमसंग लवकरच ५ जी सेगमेंट फोनसह ६ नवीन मोबाइल ग्राहकांसाठी बाजारात आणणार आहे. हे सर्व स्मार्टफोन कधी लॉन्च केले जातील याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही. परंतु, लवकरच सॅमसंग सॅमसंग गॅलेक्सी एम ६२, गॅलेक्सी ए २२, गॅलेक्सी एफ ५, गैलेक्सी एम ३२, गॅलेक्सी ए ५२ ५ जी आणि गॅलेक्सी एफ २२ सारख्या फोन लाँच करणर आहे. हे स्मार्टफोन्स उत्कृष्ट बॅटरी लाइफ, छान डिस्प्ले , चांगला कॅमेरा यासह इतर छान वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असेल . वाचा : उत्कृष्ट बॅटरी लाइफसह सॅमसंग गॅलेक्सी एम ३२ सॅमसंग लवकरच गॅलेक्सी एम ३२ नावाचा एक उत्कृष्ट स्मार्टफोन बाजारात दाखल करणार आहे. ज्यात ६००० एमएएच बॅटरी आहे. सॅमसंगच्या या आगामी फोनच्या संभाव्य वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाल्यास यात ६.५ इंचाचा डिस्प्ले असू शकतो, ज्याचा स्क्रीन रिझोल्यूशन १०८० x२३४० पिक्सल असेल. Android v10 (Q) ऑपरेटिंग सिस्टमसह सुसज्ज या फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर असू शकतो. हा सॅमसंग स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह बेसिक व्हेरिएंटसह देईल अशी अपेक्षा आहे . सॅमसंगच्या फोन कॅमेर्‍याबद्दल सांगायचे तर यात ६४ मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर असलेला क्वाड रियर कॅमेरा असू शकतो. या फोनमध्ये २०-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम ३२ ची संभाव्य किंमत २२ हजार रुपये असू शकते. सॅमसंग गॅलेक्सी एफ५२ ५ जी मध्ये असतील ही वैशिष्ट्ये सॅमसंगचा आगामी स्मार्टफोन गॅलेक्सी एफ५२ ५जी मध्ये अनेक खास वैशिष्ट्ये मिळतील. या बजेट स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७५० जी प्रोसेसर तसेच फुल स्क्रीन फुल एचडी डिस्प्ले, ४५०० एमएएच बॅटरी, ८ जीबी रॅम यासह अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये मिळतील. ६४ मेगापिक्सलचा प्राइमर सेन्सर असलेला क्वाड रियर कॅमेरा असलेला हा फोन २५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात येईल. सॅमसंग गॅलेक्सी एम ६२ मध्ये ७००० एमएएच बॅटरी गॅलेक्सी एफ ६२ सॅमसंग गॅलेक्सी एम ६२ च्या रीब्रँडेड व्हर्जनमध्ये ७००० एमएएच बॅटरी, ६.७ इंचाची एचडी + सुपर एमोलेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले, ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज, सेल्फीसाठी होल-पंच कटआउट, एक्सीनोस ९८२५ प्रोसेसर आणि इतर काही वैशिष्ट्ये असू शकतात. कॅमेर्‍याविषयी सांगायचे झाले तर यात ६४ मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर व वेगवान चार्जिंग सपोर्टसह क्वाड रियर कॅमेरा सेटअप ही वैशिष्ट्ये असू शकतात. गॅलेक्सी ए २२ मध्ये असू शकतात ५ कॅमेरे सॅमसंग गॅलेक्सी ए२२ ४ जी सोबत ५ जी सपोर्ट देखील देऊ शकतो. अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टमच्या आधारे गॅलेक्सी ए २२ मध्ये ६००० एमएएच बॅटरी, ४ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४८० ५ जी प्रोसेसर यासह बर्‍याच वैशिष्ट्ये दिसू शकतात. कॅमेर्‍याबद्दल सांगायचे तर यात ४८ मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर असलेला क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. मध्यम श्रेणीमध्ये गॅलेक्सी एफ २२ आणि गॅलेक्सी ए ५२ सॅमसंगने मिड-रेंजमध्ये खूप चांगले फोन लॉन्च केले असून येत्या काळात गॅलेक्सी एफ २२ आणि गॅलेक्सी ए ५२ बाजारात आणणार आहे. गॅलेक्सी एफ २२ मध्ये अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टम, पॉवरफुल बॅटरी, ६ जीबी रॅम, ६.५ इंच डिस्प्ले, ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा यासह इतर वैशिष्ट्ये असतील. सोबतच गॅलेक्सी ए ५ मध्ये अँड्रॉइड ११ ओएस, १२८ जीबी + २५६ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम, ६.५ इंच एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्लेसह इतर वैशिष्ट्ये असतील. हे दोन्ही स्मार्टफोन ५ जी कनेक्टिव्हिटीसह देखील लाँच केले जाऊ शकतात. सॅमसंग हे मोबाईल ३०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच करू शकतो. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eqwIIf