मुंबई- देशात करोनाची दुसरी लाट सुरू आहे. देश सध्या भयंकर परिस्थितीला सामोरा जात आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य यंत्रणा दिवसरात्र झटत आहेत. कित्येकांना आपल्या प्राणांना मुकावं लागत आहे. या परिस्थितीत अनेक बॉलिवूड कलाकार करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. प्रत्येकजण आपापल्यापरिने गरजूंची मदत करत आहे. काही कलाकार सोशल मीडियाचा वापर करत इतरांना माहिती पुरवण्याचं काम करत आहेत तर काही कलाकार ऑक्सिजन आणि बेड्सचा पुरवठा करत आहेत. अभिनेत्री देखील आपल्या पतीसोबत मिळून गरजूंची मदत करण्यात व्यग्र आहे. परंतु, एका युझरने ट्विंकलला तुम्ही मदतीचं ढोंग करत आहेत असं म्हटलं आहे. एका माजी ऑफिसरने ट्वीट करत ट्विंकलला म्हटलं, 'ट्विंकलजी, तुमचे पतिदेव या देशातील सगळ्यात श्रीमंत कलाकारांमधील एक आहेत. वर्गणी गोळा करून लोकांची मदत करण्याचं नाटक करण्यापेक्षा तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने आणखी थोडं मन मोठं करून इतरांची मदत केली असती तर ते चांगलं असतं. ही मदत मागण्याची नाही मदत करण्याची वेळ आहे.' युझरच्या या ट्वीटवर सणसणीत उत्तर देत ट्विंकलने लिहिलं, 'आता पर्यंत १०० कॉन्सण्ट्रेटर्स दान केले आहेत आणि त्याशिवाय आणखीही मदत करत आहोत. जसं मी आधी पण स्पष्ट केलं आहे की हे माझ्या किंवा तुमच्याबद्दल नाहीये. आपल्याला सगळ्यांना मिळून गरजू लोकांची मदत करायची आहे. पण दुःखाची गोष्ट ही आहे की आता जेव्हा मिळून इतरांची मदत केली पाहिजे तेव्हा काही लोक दुसऱ्यांना त्रास देण्यात आणि ट्रोल करण्यात गुंतले आहेत. तुम्ही सुरक्षित राहा.' ट्विंकलच्या या उत्तराने त्या युझरची बोलतीच बंद झाली. करोना लाटेच्या सुरुवातीपासूनच ट्विंकल गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे आली होती. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारला देखील करोनाची लागण झाली होती. अक्षयने या बद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3erpHXL