मुंबई: ९० च्या दशकात कोट्यवधी लोकांच्या हृदयावर राज्य करणारी धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस. माधुरी दीक्षितचा जन्म १५ मे १९६७ रोजी मुंबईमध्ये झाला. मराठी ब्राह्मण परिवारात जन्मलेल्या माधुरीला दोन मोठ्या बहीणी आणि एक मोठा भाऊ आहे. माधुरीनं तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 'अबोध' या चित्रपटातून केली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही पण माधुरीच्या अभिनयाचं मात्र बरंच कौतुक झालं. त्यानंतर माधुरीनं अनेक हिट चित्रपटात काम केलं. एक वेळ अशीही होती की, जेव्हा माधुरी त्या काळच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक मानधन घेत असे. माधुरी संबंधित बॉलिवूडमध्ये अनेक किस्से ऐकिवात आहेत. पण एक किस्सा कारगिल युद्धाशी संबंधित आहेत. फक्त भारतीयांमध्येच नाही तर पाकिस्तानमध्येही लोकप्रिय आहे. तिच्या एका हास्याचे लाखो लोक चाहते होते. माधुरीचे पोस्टर्स पाकिस्तानी चाहत्या आपल्या रुममध्ये लावत असत. सर्वांचं स्वप्न होतं की, एकदा तरी माधुरी दीक्षितला भेटावं. हा किस्सा कालरगिल युद्धाच्या वेळचा असल्याचं बोललं जातं. जेव्हा सीमारेषेवर जेव्हा युद्ध सुरू होतं त्यावेळी पाकिस्ताननं, 'आम्ही काश्मीर सोडून देऊ जर तुम्ही माधुरी दीक्षित आम्हाला सोपवाल' असं म्हटलं होतं. माधुरीसाठी चाहत्यांचं जेवढं प्रेम मिळालं तेवढं दुसऱ्या कोणत्याच अभिनेत्रीला मिळालं नाही. माधुरीनं 'तेजाब', 'राम लखन', 'परिंदा', 'साजन', 'खलनायक', 'दिल', 'बेटा', 'हम आपके हैं कौन', 'दिल तो पागल है', 'लज्जा', 'पुकार', 'देवदास' यांसारख्या काही सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. तिच्या काळातील जवळपास सर्व स्टार कलाकारांसोबत तिनं काम केलं होतं. या काळात माधुरीच्या अफेअरचे किस्से तर बरेच गाजले. एवढंच नाही तर माधुरी दीक्षित संजय दत्तसोबत लग्न करणार अशी चर्चाही रंगली होती. पण १९९३ मध्ये संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट हल्ल्याच्या प्रकरणात अडकला त्यावेळी माधुरीनं त्याच्यासोबतचं नातं तोडलं. त्यानंतर तिनं डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं आणि अमेरिकेला स्थायिक झाली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fpnE5E