मुंबई- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री सध्या अडचणींचा सामना करत आहे. काजलने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. कालजने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.बॉलिवूडमधील 'सिंघम', 'स्पेशल २६' चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या काजलकडे सध्या चित्रपटांची कमी आहे. लग्नानंतर काजलला चित्रपटांच्या ऑफर येणं कमी झालं आहे. त्यामुळे अभिनेत्रीने मोठा निर्णय घेत आपल्या मानधनात देखील कपात केली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, काजलला लग्नानंतर तिच्या करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. काजलने ३० ऑक्टोबर २०२० रोजी याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर मात्र काजलला ऑफर होणाऱ्या चित्रपटांच्या संख्येत घट आली आहे. त्यामुळे काजल आपल्या करिअरबद्दल चिंतेत आहे. आपलं चित्रपटसृष्टीतील स्थान कायम ठेवण्यासाठी काजलने मोठा निर्णय घेत तिच्या मानधनातही कपात केली आहे. जास्तीत जास्त चित्रपटांच्या ऑफर मिळवण्यासाठी काजलने आपलं मानधन तब्बल अर्ध्यावर आणलं आहे. तिच्यासाठी हा निर्णय घेणं सोपं नव्हतं परंतु, चांगले चित्रपट हातातून निसटू नयेत यासाठी तिने हा निर्णय घेतला. काजलकडे असलेल्या चित्रपटांची संख्या जरी कमी असली तरीही आता काजलच्या हातात अनेक मोठे चित्रपट आहेत. काजल लवकरच साउथचे सुपरस्टार चिरंजीवीच्या 'आचार्या' चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. यासोबतच काजल अभिनेते कमल हसन यांचा बिग बजेट चित्रपट 'इंडियन २' मध्ये देखील झळकणार आहे. त्याचप्रमाणे काजलकडे नागार्जुन यांचाही एक चित्रपट आहे. परंतु, काजलला भविष्यातील करिअरची चिंता लागून राहिली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3c4ovbc