Full Width(True/False)

विवोचा नवा स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर सोबत येतोय, जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्लीः शाओमी, सॅमसंग आणि ओप्पो सारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी विवो आपला नवीन स्मार्टफोन लवकरच ग्लोबली लाँच करणार आहे. या दरम्यान, कंपनीचा एक डिव्हाइसला गुगल कन्सोल वेबसाइटवर पाहिले गेले आहे. हा फोन असल्याचे मानले जात आहे. वाचाः माय स्मार्ट प्राइस रिपोर्टच्या माहितीनुसार, विवोचा अपकमिंग स्मार्टफोन Vivo Y53s V2058 मॉडल नंबर सोबत गुगल प्ले कन्सोल वेबसाइटवर लिस्ट आहे. लिस्टिंगनुसार, विवोचा हा फोन ८ जीबी रॅम आणि ऑक्टा कोर, मीडीयाटेक हीलियो जी ८० प्रोसेसर सोबत येणार आहे. याशिवाय, या फोनमध्ये फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि अँड्रॉयड ११ चा सपोर्ट मिळणार आहे. या डिव्हाइसला गुगल प्ले कन्सोल आधी बीआयएस वेबसाइटवर पाहिले गेले होते. त्यामुळे या फोनला भारतीय बाजारात सुद्धा लाँच केले जाण्याची शक्यता आहे. वाचाः Vivo Y53s ची संभावित किंमत विवोकडून Vivo Y53s स्मार्टफोनची लाँचिंग, किंमत आणि फीचरसंबंधी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु, लीक झालेल्या रिपोर्टनुसार, या फोनची किंमत बजेट रेंज मध्ये ठेवली जाऊ शकते. या फोनला जूनच्या सुरूवातीला ग्लोबली लाँच केले जाऊ शकते. वाचा : Vivo Y52s ला सर्वात आधी चीनमध्ये करण्यात आले होते. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत १५९८ चिनी युआन म्हणजेच १८ हजार १०० रुपये किंमत होती. या फोनमध्ये ६.५८ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1,080x2,408 पिक्सल आहे. सोबत या फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेंसिटी ७२० प्रोसेसर दिला आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/343c3UK