Full Width(True/False)

Jio vs Airtel vs Vi: रोज ४ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 'इतकी' वैधता

नवी दिल्ली. करोना मुळे एक वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड सुरु झाला. कित्येक लोक अजुनही घरूनच काम करत आहे. घरून काम करायचे असेल तर घरी वायफाय कनेक्शन असणे खूप महत्वाचे आहे, परंतु बहुतेक वापरकर्ते ते वापरण्यास सक्षम नाहीत. बरेच वापरकर्ते फक्त मोबाइल डेटा वापरुन घरून काम करतात. अशात आम्ही तुमच्यासाठी तीनही ऑपरेटरची सर्वोत्कृष्ट प्रीपेड प्लान्सची माहिती घेऊन आलो आहो. मोबाइल नेटवर्क वापरणार्‍या वापरकर्त्यांना दररोज ४ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० मेसेजेस या प्लान्समध्ये मिळतील. या दरम्यान त्यांना ५६ दिवसांची वैधताही मिळते. जाणून घ्या डिटेल्स. वाचा : ५५८ रुपयांचा एअरटेल प्रीपेड प्लान जर तुम्ही एअरटेलच्या ५५८ रुपयांचा प्रीपेड प्लान खरेदी करायचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला अनलिमिटेड कॉल, दररोज ३ जीबी डेटा आणि १०० मेसेजेस मिळतील. या प्लान ची वैधता सध्या ही ३ जीबी असून हा सध्या उपलब्ध असलेला सर्वात स्वस्त प्लान आहे. कारण ,३९८ रुपयांच्या योजनेत २८ दिवसांची वैधता दिली जाते. एअरटेलमध्ये सध्या ४ जीबी डेटा असा कोणताही प्लान नाही. Vi चा ४४९ रुपयांचा प्रीपेड प्लान एअरटेल आणि जिओच्या तुलनेत टेलिकॉम जायंट येथे ४४९ रुपयांचा प्रीपेड प्लान देत आहे. यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची , दररोज २ जीबी डेटा आणि १०० मेसेज देखील मिळतील. हा प्लान डबल डेटा ऑफरसह आला असून याची वैधता ५६ दिवसांची आहे. ४४४ रुपयांचा जिओ प्रीपेड प्लान जिओमध्ये ४ जीबीची प्रीपेड योजना नाही. परंतु ३ जीबी प्लान उपलब्ध आहे. यात २८ आणि ८४ दिवसांची वैधता मिळेल. ४४ रुपयांचा जिओ रिचार्ज पॅक देखील यात मिळू शकेल. ज्यामध्ये रोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० मेसेजेस मिळतील. ही वैधता ५६ दिवसांची आहे. तुम्ही ३४९ रुपयांची रुपयांचा प्लान देखील खरेदी करू शकता. यात दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल आणि १०० मेसेजेस मिळतील. परंतु , या प्लानची वैधता केवळ २८ दिवसांची आहे. ११ रुपयांचा प्लान देखील यात उपलब्ध आहे. जिथे आपल्याला १ जीबी डेटा मिळेल. त्याचवेळी ५१ रुपयांमध्ये ६ जीबी डेटा आणि १०१ रुपयांमध्ये १२ जीबी डेटा उपलब्ध आहे. १५१ रुपयात ३० जीबी, २०१ रुपयांना ४० जीबी आणि २५१ रुपयांमध्ये ५० जीबी डेटा मिळू शकेल. वैधता ३० दिवसांची असेल. वाचा वाचा: वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33ZRskh