मुंबई: बॉलिवूड अभिनेता शेवटचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या 'मुंबई सागा' या चित्रपटात दिसला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इम्रान हाश्मीनं आणि यांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि दुरावा यावर भाष्य केलं. 'माझे बरेच चित्रपट अपयशी ठरले असं मी कधीच म्हणत नाही. त्यापेक्षा मी असं म्हणेन की मी अशा चित्रपटांमध्ये काम केलं जे फार लोकप्रिय झाले नाहीत' असं यावेळी इम्रान हाश्मी म्हणाला. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखती इम्रान हाश्मी म्हणाला, 'आपले सर्वाच्या सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले असं म्हणणं कोणत्याही अभिनेत्यासाठी तसं कठीणच आहे. कारण असा कोणताच अभिनेता किंवा अभिनेत्री नाही ज्यांना १०० टक्के यश मिळालं आहे. मी माझ्या त्या चित्रपटांच्या अनुभवाबद्दल सांगेन ज्यांच्यामुळे मला ओळख मिळाली. जसं की 'शंघाई' या चित्रपटात काम करणं माझ्यासाठी सर्वात उत्तम अनुभव होता. अर्थात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नसला तरी तो माझ्यासाठी एक उत्तम चित्रपट होता.' महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांच्या वेगळं होण्याबाबत इम्रान म्हणाला, 'विशेष फिल्म्ससोबत माझ्या अनेक सुंदर आठवणी जोडलेल्या आहेत. आम्ही सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन काम करावं असं मला मनापासून वाटतं. या इंडस्ट्रीमध्ये कोणतीच गोष्ट कायमची नसते. आम्ही आजही एक कुटुंब आहोत. महेशजी आणि मुकेशजी वेगळे का झाले याचं कारण तर मला पूर्णपणे माहीत नाही. पण इथे कोणतीच गोष्ट कायम राहत नाही कदाचित हेच कारण असू शकतं आणि माझ्याबद्दल बोलायचं तर मी त्या दोघांशीही बोलतो. 'मुंबई सागा' रिलीज होण्याआधी मुकेशजींना मला फोन करुन विश केलं होतं. याशिवाय मी महेश भट्ट यांच्याही संपर्कात असतो.' इम्रान पुढे म्हणाला, 'मी लॉकडाऊन दरम्यानच महेश भट्ट यांच्याशी बोललो. ते फक्त एक निर्मात नाहीत तर एक बुद्धिमान व्यक्ती आहेत ज्यांनी मला नेहमीच चांगलं मार्गदर्शन केलं. जेव्हा लॉकडाऊनमध्ये माझ्यासमोर अनेक समस्या होत्या त्यावेळी मला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज होती आणि त्यांनी ते केलं.' अनेक वर्ष एकत्र काम केल्यानंतर महेश भट्ट आणि मुकेश भट्ट व्यावसायिक पातळीवर याच वर्षी एकमेकांपासून वेगळे झाले. या दोघांनी मिळून 'विशेष फिल्म्स' नावाच्या कंपनीसोबत मिळून अनेक वर्ष उत्तम कामगिरी केली. पण यावर्षी जानेवारीमध्येच कंपनीचे संस्थापक मुकेश भट्ट यांनी राजीनामा दिला. त्यांनी सांगितलं की, आता ही कंपनी त्यांची मुलं सांभाळणार आहेत. तर मुकेश भट्ट फक्त मार्गदशक म्हणून काम करतील.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tLEMId